एक्स्प्लोर

Horoscope Today, June 18, 2022 : कर्क, सिंहसह ‘या’ राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य  

Horoscope Today, June 18, 2022 : मेष राशीच्या लोकांचे नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना वादात न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.

Horoscope Today, June 18, 2022 : आज चंद्र मकर राशीत आहे, संध्याकाळनंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्योदयाच्या वेळी श्रवण नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. तर, शनी कुंभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचे नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना वादात न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घेऊया आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आर्थिक दृष्टीकोनातून दिवस समाधानकारक जाणार आहे. दिवसाच्या सुरुवातीपासूनच पैसे मिळवण्याची इच्छा मनात राहील. दिवसाच्या मध्यापर्यंत तुम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. चांगली बातमी मिळेल. स्वावलंबी व्हा. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क होईल, ज्यांचा भविष्यात तुम्हाला उपयोग होईल.

वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायात आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या कामात मात्र काळजी घ्यावी लागेल. आळस आणि चिंता राहील. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांशी वादात पडू नका. आग आणि पाणी असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा. दुपारनंतर व्यवहाराच्या बाबतीत लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. घरगुती जीवनात शांतता राहील.

मिथुन (Gemini Horoscope) : आजूबाजूचे वातावरण तुमच्या विचारांच्या विरुद्ध असण्याची शक्यता आहे. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. लवकरच मार्ग सापडेल. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करा, अन्यथा विनाकारण वाद वाढू शकतो. नकारात्मक विचार मनातून दूर ठेवा. आहारात काळजी घ्या. आज वाहन चालवताना खूप काळजी घ्या. आकस्मिक पैसा खर्च होऊ शकतो. काही कारणाने बाहेरगावी जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

कर्क (Cancer Horoscope) : मुलांच्या काही चुका शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मोठ्या व्यक्तीशी संबंधित समस्यांमुळे तुमची दिनचर्या थोडी व्यस्त होऊ शकते. कामात पूर्ण लक्ष द्या. आर्थिक बाबतीत तुमचा दिवस चांगला जाईल. दुपारनंतर तुम्ही कोणत्याही बाबतीत निर्णय घेऊ शकणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. भागीदारीच्या कामात मतभेद वाढतील. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवा. आज नवीन काम सुरू करू नका.

सिंह (Leo Horoscope) : व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात धन योजना पूर्ण करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशातील कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. घरातील सदस्यांशी काही विषयावर वाद होऊ शकतात. आकस्मिक पैसा खर्च होईल. भागीदारीच्या कामात अंतर्गत मतभेद होतील. जर तुम्ही एखाद्या कामात जास्त वेळ घालवलात, तर मोठी गोष्ट तुमच्या हाताबाहेर जाऊ शकते.

कन्या (Virgo Horoscope) : एखाद्या नातेवाईकाशी संवाद साधून तुम्हाला आनंद वाटेल. कोणालाही विचारपूर्वक उत्तर द्या, अन्यथा जवळच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात. आज वैयक्तिक काम पूर्ण करू शकता. मार्केटिंगशी संबंधित कामांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही जुना वाद आज मिटू शकतो. व्यवसायासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैशाच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. घरात सुख-शांती नांदेल. आरोग्य चांगले राहील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. स्थिर मालमत्तेच्या बाबतीत, तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. कामावर लक्ष केंद्रित करा. दुपारनंतर वेळ तुमच्या अनुकूल असेल. मनाप्रमाणे काम करा, तुम्हाला आराम वाटेल. घरातील मोठ्यांची विशेष काळजी घ्या. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. सरकारी किंवा इतर कागदोपत्री कामे आंधळेपणाने करू नका.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक अस्वस्थ व्हाल. सामाजिक क्षेत्रात सहकार्य मिळेल. आज तुम्ही संयमाने कमी काम करा, अनैतिक कामात अडकण्याची शक्यता आहे. क्षणाक्षणाला मनातील विचार बदलल्याने योग्य निर्णय घेणे कठीण होईल. एखाद्याला दिलेले पैसे परत घेण्यासाठी आणि मार्केटिंगशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : आध्यात्मिक कामासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनात जी कोंडी आहे, ती दूर होईल. शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. गुप्त शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. आज अधिकारी नोकरदार लोकांची प्रशंसा करतील. प्रेम जीवनात समाधानाची भावना राहील.

मकर (Capricorn Horoscope) : दैनंदिन कामेही उशिराने पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस असल्याने मानसिक शांतता राहील. आज अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक व्यावहारिकता उपयोगी पडेल. तुम्ही नवीन कामांची रूपरेषा आखू शकता. सकारात्मक बदल तुमच्या आरोग्यावर आणि व्यक्तिमत्वावर चांगले परिणाम करतील. निष्काळजीपणामुळे यश हाताबाहेर जाऊ शकते. शेअर बाजारात भांडवल गुंतवू शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : धार्मिक, सामाजिक कार्यात पैसा खर्च होईल. नातेवाईक आणि मित्रांसोबत वाद होऊ शकतात. आज तुम्हाला वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. मानसिक शांती लाभेल. चिंता आणि तणाव दूर होईल. जोडीदारासोबतच्या प्रेमसंबंधात मधुरता वाढेल.

मीन (Pisces Horoscope) : दिवसाच्या सुरुवातीला अचानक आर्थिक लाभ झाल्याने उत्साह वाढेल. चांगली बातमी मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. व्यस्त दिनचर्येमुळे शारीरिक थकवा जाणवेल. घरात काही धार्मिक कार्येही होतील, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहील. शेजाऱ्याशी किरकोळ वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. सध्याच्या कामात गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget