एक्स्प्लोर

Horoscope Today, June 12, 2022 : मेष, मिथुनसह ‘या’ राशींनी आज नव्या कामाची सुरुवात करू नका! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 12, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज शत्रूपासून सावध राहावे लागणार आहे. वृषभेच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope Today, June 12, 2022 : आज श्रावण नक्षत्र आहे. चंद्र तूळ राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज शत्रूपासून सावध राहावे लागणार आहे. वृषभेच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका.  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. वाणी व वर्तनावर संयम ठेवा. कोणाचाही मत्सर करू नका आणि शत्रूंपासून सावध राहा. यावेळी कोणतेही काम घाईने करू नका. घरात एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज निर्माण होतील आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल.

वृषभ (Taurus Horoscope) : व्यवसायात यश मिळेल. सहकारी कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. विरोधकांना मागे टाकता येईल. दुपारनंतर मनोरंजनावर तुमचा भर असेल. प्रिय मित्राची भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. तुम्हाला सन्मान मिळेल. आज तुम्ही गुंतवणुकीबाबत मोठी योजना देखील करू शकाल. लहानसहान दुर्लक्षामुळेही भावांमध्ये वाद होऊ शकतात. आरोग्य थोडे नरम राहू शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : तुम्हाला तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा फायदा काही काळासाठी मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. धार्मिक, सामाजिक संस्थांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. जमिनीशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल, तर तो लवकरच शांततेने सोडवला जाऊ शकतो. नवीन काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी आजचा दिवस शुभ नाही. घरातील वातावरण शांत राहील.

कर्क (Cancer Horoscope) : गैरव्यवस्थापनामुळे काम बिघडू शकते, त्यामुळे जे काही काम असेल त्याबाबत चांगले नियोजन करा. व्यवसाय चांगला चालेल, काही नवीन गुंतवणूकदार देखील पुढे येऊ शकतात, ज्यामुळे व्यवसाय अधिक वेगाने प्रगती करेल. निराशेमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.

सिंह (Leo Horoscope) : आज व्यवसाय किंवा नोकरीनिमित्ताने छोटा प्रवास होऊ शकतो. परदेशातून काही चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होईल. नवीन कामासाठी वेळ चांगला आहे. लाभदायक गुंतवणुकीत रस घेऊ शकता. दुपारनंतर तुम्ही अधिक सहनशील व्हाल आणि काही काळ तुम्हाला मानसिक उदासीनता जाणवेल. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : घरात विशेष पाहुण्यांच्या आगमनाने व्यस्त राहू शकता. यामुळे दैनंदिन जीवनात थोडासा बदल आणि आरामही येऊ शकतो. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काही खास नियम कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे, अन्यथा त्यांना पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचा विरोधक तुमच्या विरोधात थोडी आक्रमक भूमिका घेऊ शकतो. मनात एखाद्या गोष्टीबाबत दुविधा असेल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका.

तूळ (Libra Horoscope) : सर्जनशीलतेच्या जोरावर तुम्ही कोणतेही अवघड काम सहजपणे पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. विचार ठाम राहतील. नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन कपडे, दागिने किंवा मनोरंजनावर पैसा खर्च होईल. दुपारनंतर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाईल. सहकाऱ्यांशी वाद टाळा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : घाई न करता शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही जवळच्या लोकांना भेटाल जे खूप सकारात्मक असू शकतात. घराच्या नूतनीकरणाचे नियोजन करता येईल. काहीवेळा अभिमान आणि अतिआत्मविश्वासाची स्थिती तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते, ज्यामुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. एखाद्या विशिष्ट कामात घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या.

धनु (Sagittarius Horoscope) : कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य चर्चा करा. घरातील मोठ्या व्यक्तींचा अनादर करू नका. त्याचे आशीर्वाद तुम्हाला खूप चांगले परिणाम देतील. आज मार्केटिंगशी संबंधित काम टाळणे चांगले. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. शारीरिक आणि मानसिक थकवा कायम राहू शकतो. नोकरीत पदोन्नती होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल.

मकर (Capricorn Horoscope) : स्थायी मालमत्तेच्या कामासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात यश मिळेल. व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवीन योजनेवर काम कराल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. आज बढतीची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : व्यावसायिकांना आज सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. नोकरीत अधिकाऱ्यांशी संवाद साधताना काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याची किंवा शिक्षणाची चिंता राहील. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. गृहस्थ जीवनात आनंद राहील. व्यवसायात भागीदारीच्या कामात सहकार्य मिळेल. दिवस यशस्वी आणि शुभ राहील.

मीन (Pisces Horoscope) : कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला बहुतेक वेळा शांत राहावे लागेल आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आध्यात्मिक कामांसाठी दिवस चांगला आहे. निर्णय घेताना त्रास होत असेल, तर घरातील मोठ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अहंकार मार्गात आडवा येऊ देऊ नका. अन्यथा तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना 'तेव्हा' उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Raj Thackeray & Uddhav Thackeray: बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
बंडखोरी टाळण्यासाठी राज-उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, शेवटपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवणार, फायनल निर्णय झाल्यावर...
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी...'; धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?
Embed widget