एक्स्प्लोर

Horoscope Today, July 2, 2022 : कन्या, तूळसह ‘या’ राशींसाठी आजचा दिवस असणार आनंददायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, July 2, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज एखादी गोष्ट दुःखी करू शकते. तर, वृषभ राशीचे लोक आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष देतील.

Horoscope Today, July 2, 2022 : आज आश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशी आहे. गुरु मीन राशीत आहे. शनि कुंभ राशीत आणि सूर्य मिथुन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज एखादी गोष्ट दुःखी करू शकते. तर, वृषभ राशीचे लोक आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष देतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : एखादी गोष्ट तुम्हाला दुःखी करू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस मध्यम फलदायी आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. एखाद्या गोष्टीच्या तणावामुळे तुमचे मन कामात रमणार नाही. गुंतवणूक करायची असेल, तर करू शकता, नफा होईल. तरुणांनी कुठेही विचारपूर्वक बोलावे, अन्यथा ते लोकांच्या हास्याचा विषय बनू शकतात. कौटुंबिक वादात घाईघाईने निर्णय घेणे योग्य नाही.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमची चिंता कमी होईल आणि तुमचा उत्साह वाढेल. मन प्रसन्न राहील. तुम्ही अधिक संवेदनशीलता आणि भावनिकता अनुभवाल. भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील. साहित्यात रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळा. आर्थिक बाबींवर अधिक लक्ष द्याल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. पैशाची आवक वाढेल. प्रियजनांचे सहकार्य मिळेल. आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मात्र, कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो, तरीही प्रयत्न करत रहा. आर्थिक नियोजनात काही अडथळे येतील. मात्र, ही अडचण वेळेत दूर होईल. नोकरी-व्यवसायात सहकारी कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांशी फलदायी चर्चा होईल. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा काळ चांगला आहे. कौटुंबिक जीवनही आनंदाने जाईल. ज्या कामाचा त्यांना अनुभव नाही ते टाळण्याचा प्रयत्न करावा.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तुमचा निर्णय खूप फायदेशीर ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे, यशाचे नवीन मार्ग उघडतील. चांगली बातमी मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात सुख आणि समाधानाची भावना राहील. प्रेम जीवनात प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत केल्याने मनाला आनंद मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

सिंह (Leo Horoscope) : तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक बाबींमध्ये तुम्ही चिंतेत राहाल. चिंतेमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. अनावश्यक वाद टाळा. कोर्टाचे काम लक्षपूर्वक सांभाळा. परदेशातून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अर्वाच्य भाषा वापरू नका. गोंधळ ताबडतोब दूर करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराच्या विचारांचा आदर करा.

कन्या (Virgo Horoscope) : नोकरीतील प्रगतीमुळे तुम्ही आनंदी असाल. मात्र, नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो. आर्थिक लाभ संभवतो. विविध क्षेत्रांतून कीर्ती, यश आणि नफा मिळेल. धनप्राप्तीसाठी आजचा दिवस शुभ आहे. मित्रांकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियजनांसोबतची भेट आनंददायी होईल. व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. कार्यालयीन कामामुळे प्रवासाचे आयोजन करता येईल.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. घर आणि ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना पदोन्नतीची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढेल. अधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळेल. चांगले वैवाहिक सुख मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे. व्यावसायिकांनी उधारीवर वस्तू देणे टाळावे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : भाग्य तुमची साथ देणार आहे. आज नोकरीच्या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, काम हळू पण निश्चितपणे पूर्ण होईल. ऑफिसमध्ये तुमचा दिवस खूप प्रभावशाली जाईल, मीटिंगमध्ये तुमचे म्हणणे लोक लक्षपूर्वक ऐकतील. शारीरिक थकवा, आळस आणि मानसिक चिंता जाणवेल. आरोग्याची काळजी राहील. विरोधकांशी वाद घालू नका. अनावश्यक खर्च वाढतील. अधिकाऱ्यांचे वर्तन नकारात्मक राहील. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

धनु (Sagittarius Horoscope) : आज कोणतेही नवीन काम आणि जुन्या आजारांवर उपचार सुरू करू नका. अतिसंवेदनशीलतेमुळे तुमची मानसिक स्थिती चांगली राहणार नाही. आपल्या भाषेवर संयम ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. अनैतिक कृत्ये करण्यापासून दूर राहा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदाने जाईल. वाईट संगत असेल, तर त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनावर जास्त खर्च करणे टाळा.

मकर (Capricorn Horoscope) : व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. कमिशन, व्याज इत्यादींमधून उत्पन्न वाढेल. आर्थिक नफ्याचा मजबूत योग आहे. मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटेल. ऑफिसच्या कामात यश मिळेल. विचारांमध्ये थोडा गोंधळ आणि अस्थिरता राहील. यामुळे दुपारनंतर तुमचे मन कामात गुंतून राहणार नाही. मित्रांची भेट होईल. कामाचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : शत्रूंचा पराभव होईल. तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायाचा विस्तार करा, तरच उत्पन्न वाढेल. कामात यश मिळण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज केलेल्या कामामुळे तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. शरीर आणि मनाने आनंदी राहाल. नोकरीत सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात.

मीन (Pisces Horoscope) : आजपासूनच नवीन कामाला सुरुवात करू शकता. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, यशाचे नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही व्यवसायातील सर्व समस्या सहज सोडवू शकाल. आज ऑफिसमध्ये कामावर एकाग्रता ठेवा. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. फिरायला जाण्याची योजना बनू शकते. व्यावसायिक प्रगतीमुळे आनंदी राहाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget