(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 16 July 2022 : या राशींसाठी शनिवार आहे खास, जाणून घ्या राशीभविष्य
Horoscope Today 16 July 2022 : शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचालींचा विशेषत: काही राशींवर परिणाम होतो.
Horoscope Today 16 July 2022 : काही राशींसाठी शनिवार खास असणार आहे. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचालींचा विशेषत: काही राशींवर परिणाम होतो. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.
वृषभ : शनिवार तुमच्यासाठी खास दिवस आहे. आज तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळू शकते. पैसा खर्च होऊ शकतो, महागडी वस्तू विकत घेऊन घरी आणू शकता. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना आज आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मात्र कार्यालयीन कामकाज आजही सुरू राहणार आहे. आज तुम्ही भविष्याचा विचार करून गुंतवणूक योजना देखील बनवू शकता.
तूळ : शनिवारचा दिवस आहे. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करा, फायदा होईल. शनि तुमच्या राशीला पाहत आहे. आज कर्ज घेण्याचा विचार करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. तुम्ही प्रवासाची योजना देखील करू शकता.
मकर : शनिवार तुमच्यासाठी खास दिवस असणार आहे. सध्या शनिदेव तुमच्याच राशीत प्रतिगामी भ्रमण करत आहेत. आज तुमच्या स्वभावाकडे लक्ष द्या. एकाद्या छोट्याशा कारणावरून लवकर रागावू नका आणि इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :