एक्स्प्लोर

Horoscope Today, August 9, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 9, 2022 : मेष राशीच्या लोकांना कामात काही अडचणी येऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना नियोजन करून कामे पूर्ण करावी लागतील.

Horoscope Today, August 9, 2022 : सूर्योदयाच्या वेळी चंद्र मूळ नक्षत्रात असून, धनु राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे. तर, सूर्य कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना कामात काही अडचणी येऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना नियोजन करून कामे पूर्ण करावी लागतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती काहीशी कमकुवत होऊ शकते. नोकरदारांना कामात काही अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक व्यवसायाचे नियोजन करून नवीन कामे सुरू करू शकतात. व्यापार्‍यांसाठीही लांबचा प्रवास फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमचा दिवस उत्साहात जाईल. नवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जा. एखाद्या जुन्या कामामुळे अचानक लाभ मिळू शकतो. व्यापारी वर्गाने नियोजन करूनच काम करावे. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमच्यावर खूश होतील. व्यापारी वर्गासाठी दिवस आर्थिकदृष्ट्या सामान्य असणार आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना आज चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल.

मिथुन (Gemini Horoscope) : कामाच्या ठिकाणी वेळ फुकट घालवाल, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरीत उच्च अधिकार्‍यांच्या शिफारशीमुळे बढती आणि पगारवाढ मिळू शकते. कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवणूक करताना काळजीपूर्वक विचार करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या लोकांची फसवणुक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

कर्क (Cancer Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबत खास वेळ घालवाल. कामात यश मिळाल्यामुळे मन उत्साही राहील. नोकरदारांना नोकरीत फायदा होईल. सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. मात्र, बाहेरचे पदार्थ खाणे-पिणे टाळावे. विरोधकांच्या चाली निष्फळ ठरतील. तुम्ही तुमचे काम सहजपणे पूर्ण करू शकाल. जुने रखडलेले अपूर्ण काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. धनलाभाच्या संधी चालून येतील. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून तुमचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी  एखादी नवीन जबाबदारी किंवा नवे पद मिळू शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल.

कन्या (Virgo Horoscope) : आज काही महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा होईल. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये गुंतवणुकीची काही योजना असेल, तर ती आज सुरू करू शकता. काहीवेळा तुमच्या विचारांमधील नकारात्मक गोष्टी कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ शकतात. कोणत्याही चुकीच्या कामात आपला वेळ वाया घालवू नये. कामाच्या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आज अडचण येऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस मानसिक चिंतेत जाईल. आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. शत्रू पक्षाकडून नुकसान होऊ शकते. आर्थिक गुंतवणुकीत अडथळे येतील. उत्पन्नाची कमतरता जाणवू शकते. व्यापार क्षेत्रातही स्थिती कमकुवत असेल. पैशाच्या व्यवहारात सावध राहा, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जास्त खर्चामुळे बजेट कोलमडू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. नातेवाईक आणि मित्रांना भेटाल. धार्मिक कार्यक्रमात पैसा खर्च होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नवीन व्यवसाय सुरू करू नका. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कुणाच्याही गोड बोलण्यात फसू नका. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ नसल्याने, तूर्तास या योजना पुढे ढकला.

धनु (Sagittarius Horoscope) : कामाच्या ठिकाणी आजचा दिवस यशस्वी होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, मान-सन्मान वाढेल. आर्थिक समस्या दूर होतील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. व्यवसायिक कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळेल. आर्थिक बाबीत अत्यंत सावध राहा. जास्त काम केल्याने तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope) : चांगले काम करून तुम्ही लोकांची मने जिंकू शकता. परंतु तुम्हाला काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला संयम राखावा लागेल. अन्यथा शत्रू त्याचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी मेहनत घेऊन सर्व कामे पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे कौतुक होईल. लाभाच्या संधी मिळतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज एखाद्या नवीन कामाला सुरुवात करू शकता. पैसा गुंतवण्यासाठी एखादी नवीन योजना तयार करू शकता. नोकरी आणि व्यवसायासाठीही दिवस अनुकूल आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. काम वेळेवर पूर्ण केल्यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही महत्वाचा निर्णय घेऊ शकता. अपत्यांची प्रगती होईल. कुटुंबाकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope) : आर्थिक स्थिती सुधारेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसाय सुरळीत चालू राहील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात अधिकारी तुम्हाला प्रोत्साहन देतील. व्यवसायात लाभ होईल. अडकलेला पैसा परत मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत मान, प्रतिष्ठा आणि उच्च पद मिळू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget