एक्स्प्लोर

Horoscope Today, August 29, 2022 : वृषभ, तूळसह ‘या’ राशींना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 29, 2022 : मेष राशीसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या कठीण असू शकतो. वृषभ राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Horoscope Today, August 29, 2022 : आज चंद्र कन्या राशीत असून, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. सूर्य सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या कठीण असू शकतो. वृषभ राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस त्रासदायक असू शकतो. कौटुंबिक जीवनात तुम्हाला विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. सहकाऱ्यांकडून मदत मिळणार नाही. न्यायालयीन खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

वृषभ (Taurus Horoscope) : या दिवशी तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील आणि आध्यात्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. आज तुम्ही कोणतेही नवीन काम करत असाल, तर त्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, तर भविष्यात फायदा होईल. परदेशातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्ही तुमच्या करिअरच्या संदर्भात काही नवीन योजना बनवू शकता. दिवसभर कामात व्यस्त राहाल. कुटुंबातील सदस्याकडून एखाद्या कामाची जबाबदारी मिळू शकते, हे काम तुम्हाला लगेच पूर्ण करावे लागेल. नव्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाचा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नातही वाढ होऊ शकते.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा चिंतेचा असेल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यासाठी काही नवीन समस्या निर्माण करू शकतात. बुद्धीचा वापर करून तुम्ही यातून बाहेर पडू शकाल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. प्रवासाची किंवा पिकनिकची योजना देखील बनवू शकता. सामाजिक कार्यातही सहभाग घ्याल. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या मनात एखाद्या गोष्टीची चिंता राहू शकते. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात अत्यंत हुशारीने पैसे गुंतवा. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. इच्छित गोष्टी मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे एखाद्या व्यक्तीच्या मदतीने दूर करता येतील. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आज नशीब तुम्हाला साथ देईल आणि आत्मविश्वास वाढेल. व्यापारी वर्गाला जास्त कामामुळे थकवा जाणवेल. जे लोक शेअर बाजार आणि मार्केटिंगशी संबंधित आहेत, त्यांना प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सहज सामना करू शकाल. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आहे.

तूळ (Libra Horoscope) : कुटुंबातील सदस्यांची कोणत्याही गरजा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. खर्च वाढतील, त्यामुळे तुम्हाला बजेटचे नियोजन करावे लागेल. व्यवसायात कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा ते तुमची फसवणूक करू शकतात. तुम्ही स्वःमालमत्ता विकण्याचा विचार करत असाल, तर आज तो करार अडकून पडू शकतो. मानसिक तणावामुळे प्रेम जीवनात अडचणी येतील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित काही किरकोळ समस्या सोडवण्यात गुंतलेले असाल आणि काही नवीन कर्मचाऱ्यांनाही तुम्ही सामावून घेऊ शकता. घाईगडबडीत आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही, अन्यथा ती तुमची चूक ठरू शकते. सध्या सुरू असलेल्या समस्यांवर कुटुंबातील सदस्यांसोबत बसून तोडगा काढावा लागेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुमचे मन अध्यात्माकडे ओढ घेईल. एखाद्या कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण राहील, पण आर्थिक सुबत्ता वाढेल. या दिवशी केलेली गुंतवणूक आगामी काळात फायदेशीर ठरेल. एखाद्या कामात थोडे प्रयत्न केले, तर नशीबही साथ देईल. विवाहित जोडप्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. गोंधळामुळे कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका.

मकर (Capricorn Horoscope) : आत्मविश्वास भरपूर असेल, परंतु संयमाचा अभाव राहील. संभाषणात संयम ठेवा. लेखन-बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. मान-सन्मान मिळेल. मनःशांती लाभेल. बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव असू शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अडथळे येऊ शकतात. तब्येतीची चिंता राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये काही अडचणी निर्माण करेल. एखाद्याला पैसे उधार दिल्यास, ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. जर, तुम्ही कोणत्याही कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेत असाल. तर घरातील वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला काही आर्थिक समस्या येत असतील, तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊ शकता.

मीन (Pisces Horoscope) : तुम्ही आज खूप आनंदी दिसू शकतात. राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. सावध राहा कारण, तुमच्या जवळचे काही लोक तुमची फसवणूक करू शकतात आणि तुमच्यावर खोटे आरोप देखील करू शकतात. गुंतवणुकीमुळे आज पैसे बुडण्याची परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे गुंतवणूक टाळा. निराश होऊ नका आणि आत्मविश्वास कायम ठेवा. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना आज चांगला फायदा होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget