एक्स्प्लोर

Horoscope Today, August 26, 2022 : मेष, सिंहसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 26, 2022 : मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ राशीच्या लोकांना जास्त कामामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.

Horoscope Today, August 26, 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी पुष्य नक्षत्र आहे. चंद्र कर्क राशीत आहे. सूर्य सिंह राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ राशीच्या लोकांना जास्त कामामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही दिवसभर नवीन उर्जेने कामे पूर्ण कराल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी संपतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील, लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुकाची थाप मिळेल. व्यापारी वर्गाला यश मिळेल. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यावसायिक कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला हाती घेतलेल्या कामात नक्कीच यश मिळेल. नवीन प्रयत्न करत राहा. आर्थिक योजनांमध्ये काही अडथळे येतील. परंतु, वेळेनुसार ते नाहीसे होतील. कार्यालयातील सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अविवाहितांसाठी चांगले स्थळ सांगून येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस सामान्य असेल. जर, तुम्ही तुमच्या मनातील काही समस्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला सांगितल्या, तर तो तुम्हाला उपाय सांगेल. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. व्यवसायासाठी प्रवासाला जावे लागेल, हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परदेशातून आयात-निर्यातीचा व्यवसाय करणारे लोक त्यांचे कोणतेही मोठे करार फायनल करू शकतात.

सिंह (Leo Horoscope) : तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यातील आनंद वाढू शकतो. कपड्यांवरील खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मनःशांती लाभेल. व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहील. वाहन सुख वाढेल. बोलण्यात तिखटपणाचा प्रभाव असू शकतो. संभाषणात संयम राखा. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडून पैसा मिळू शकतो. मात्र, आज अनावश्यक खर्चही जास्त होईल.

कन्या (Virgo Horoscope) : आज लाभाचा दिवस आहे. व्यवसायात वाढ होऊन उत्पन्नातही वाढ होईल. नोकरदारांना लाभाची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना राहील. पत्नी, मुलगा आणि वडीलधाऱ्यांकडून फायदा होईल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. मित्रांची संगत फायदेशीर ठरेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला जाईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. एखादी मोठी संधी मिळू शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होईल. कामाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरेल. रखडलेले व्यावसायिक व्यवहार पुन्हा सुरू होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्या आत्मविश्वासात वाढ करेल. ज्यांनी बँक किंवा व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे, त्यांना ते वेळेवर परत करावे लागेल. काही नवीन काम करण्यासाठी तुम्ही तुमची सर्व मेहनत पणाला लावाल, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक ध्येय सहज साध्य करू शकाल. कौटुंबिक व्यवसायात भावांचीही मदत मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल. एखाद्या जुन्या त्रासातून सुटका मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नात्यातील तणाव दूर होईल. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल. कामाच्या ठिकाणी व्यस्त राहाल. आर्थिक योजनांवर भांडवल गुंतवाल. नफा कमावण्याची संधी चालून येईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल, तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. कामाच्या संदर्भात सुखद परिणाम मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. हातातील बरीच कामे आज पूर्ण होतील. तुम्ही कोणत्याही प्रतिस्पर्ध्याची चिंता करू नका आणि आपले काम करत राहा. व्यावसायिक क्षेत्रातही तुम्हाला फायदा होताना दिसत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरण निकाली काढता येईल, ज्यामध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज केलेल्या कामात तुम्हाला प्रसिद्धी आणि यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरीत सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारी नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकतील. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्या नवीन योजनेवर काम करू शकता. महत्त्वाच्या कामात पैसा खर्च होईल. विरोधक पराभूत होतील.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीपासूनच कामात आळस जाणवेल. पण, जसजसा दिवस पुढे जाईल, तसतशी परिस्थिती सुधारत जाईल. तुमच्या दिनचर्येत बदल होईल, दिवसाचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवता येईल. कामाच्या ठिकाणी जवळपास सर्व कामे पूर्ण होतील. शत्रू पक्ष पराभूत होईल, सामाजिक मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या कर्जातून मुक्त होता येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget