एक्स्प्लोर

Horoscope Today, August 25, 2022 : कन्या, वृश्चिकसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today August 25 2022 : मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी वादात पडणे टाळावे.

Horoscope Today August 25 2022 :  आज चंद्र वृषभ राशीत असून, पुष्य नक्षत्र आहे. अर्थात आज गुरुपुष्यामृत योग आहे. सूर्य सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी वादात पडणे टाळावे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला त्यांच्या कामात मोठे यश मिळू शकते. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस सामान्य असणार आहे. एखादे नवीन काम पूर्ण कराल. आत्मविश्वासाने लोकांना एखादी गोष्ट करण्याचा सल्ला द्याल. अवतीभवती सुरू असलेल्या वादात पडणे टाळा, अन्यथा हे वाद कायदेशीर प्रकरणात अडकू शकतात. कुटुंबातील सदस्याच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. अविवाहितांसाठी चांगले स्थळ सांगून येईल. यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मिथुन (Gemini Horoscope) : आर्थिक बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर असणार आहे. कठोर मेहनतीमुळे सर्व काही साध्य करू शकता. तसेच, आज मनातील गुंतागुंत देखील कमी होईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र, नंतर मनःशांती लाभेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी काही गोंधळात अडकाल. तुम्हाला वरिष्ठांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही परिस्थिती संयम सोडू नका आर्थिक प्रकरणे अडकू शकतात. उत्पन्न कमी असेल, पण खर्च जास्त होईल. व्यवसायात सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

सिंह (Leo Horoscope) : मनात आशा-निराशेच्या भावना असू शकतात. कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात. कामानिमित्ताने दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. एखाद्या कामासाठी मदतीचा हात मिळेल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी बढती किंवा पगारवाढ यासारखी चांगली बातमी मिळू शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या आर्थिक योजनांचा लाभ मिळेल. आगामी काळात पैसा आणि लाभ होण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड निर्माण होईल.

तूळ (Libra Horoscope) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस व्यापार-व्यवसायाच्या संबंधात काही नवीन अनुभव देणारा असेल. उद्योग-व्यवसायाशी संबंधित लोकांना विविध क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा मिळेल. तसेच, आज तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक कार्यात भाग घेता येईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. सर्व कामे सुरळीत सुरू होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्ग यशाची नवीन उंची गाठेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनच्या सुवर्ण संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : तुम्ही तुमच्या कामापेक्षा धार्मिक कार्यात जास्त लक्ष द्याल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतला, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. जे लोक कार्यक्षेत्रात बदल करण्याचा विचार करत आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय चांगला असेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. परंतु, एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope) : मन प्रसन्न राहील. खूप आत्मविश्वास असेल. मात्र, काही प्रकरणांमध्ये सावध रहा. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढू शकतो. उत्पन्न वाढेल. व्यवसायाचे नवे प्रस्ताव प्राप्त होऊ शकतात. खूप मेहनत करावी लागेल. संतती सुखात वाढ होईल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. अनियोजित खर्च वाढतील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल. व्यवसाय करणारे लोक नफा मिळवतील. ते त्यांच्या गरजा आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होतील. काही प्रभावशाली लोकांशी संपर्क साधाल, ज्यांच्याकडून तुम्हाला मदतही मिळेल. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीत हात घालणे टाळा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्ही खूप उत्साही असाल, कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील. धनलाभाचे योग आहेत. आयात निर्यात व्यवसायात सामील व्हा. नफा मिळवू शकता. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले निकाल मिळतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज

व्हिडीओ

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Embed widget