एक्स्प्लोर

Horoscope Today, August 23, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींसाठी दिवस ठरणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 23,  2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Horoscope Today, August 23,  2022 : आज आद्रा नक्षत्र आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच, प्रमोशन मिळू शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे. अचानक काही खर्च येऊ शकतो, ज्यामुळे बजेट बिघडू शकते. सामाजिक कार्यात सक्रिय असताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाचा असणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्याने मन प्रसन्न राहील. जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे काही वाढलेले खर्च बजेट बिघडवू शकतात, ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे चांगले राहील. कोणतेही काम उद्यासाठी पुढे ढकलू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. घराच्या देखभाल आणि सजावटीवर खर्च वाढेल. कामाचा व्याप वाढेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वभावात चिडचिडेपणा असू शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आज तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपल्या मधुर आवाजाने सर्वांची मने जिंकाल. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. खर्च जास्त होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे, त्यांना नवीन संधी मिळू शकते.

सिंह (Leo Horoscope) : स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. कौटुंबिक व्यवसायात अधिक नफा मिळविण्यासाठी तुम्हाला भावंडांचे सहकार्य देखील मिळू शकते. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. महिलांना घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल. कलाकारांसाठी दिवस विशेषतः चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या (Virgo Horoscope) : कुटुंबातील सदस्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतील आणि तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. काही लोकांना तुमच्या उपक्रमांचा फायदा होऊ शकतो. आपल्या महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवणे योग्य ठरेल. पैशाच्या बाबतीत नातेवाइकांशी व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमचे कोणतेही काम फायदेशीर ठरू शकते.

तूळ (Libra Horoscope) : इतरांशी बोलताना संयम ठेवा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे तुम्‍ही काही प्रभावशाली लोकांना भेटाल. व्‍यवसायात नवी ऑफर मिळू शकते. आज व्यवसाय करणारे लोक गोड वाणीनेच आपले काम पूर्ण करू शकतील. नोकरीशी संबंधित लोकांना आज अधिकार्‍यांकडून एखादी महत्त्वाची माहिती ऐकायला मिळेल. घरातील सदस्यांना विचारून पैशाचे व्यवहार करणे चांगले राहील.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल, मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. मात्र, खर्चही जास्त होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना ऑफिसमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : आज देवाच्या कृपेने तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. जोडीदाराच्या मदतीने संपत्तीत गुंवणूक करू शकता. वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. घरातील महत्त्वाच्या कामात मदत कारवाई लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचे मत विचारात घेणे खूप महत्त्वाचे आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टिकोनातून विशेष सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत. यामुळे चिडचिडेपणा आणि निराशेची भावना मनात असेल. पती-पत्नी एकमेकांच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतील. तब्येत खराब झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्ही खूप उत्साही असाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही प्रकारचे भांडवल गुंतवताना, आपले संशोधन पूर्ण करा, घाईघाईने निर्णय घेणे टाळा. व्यावसायिक कार्यात यश मिळेल, लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवाल. पैसा खर्च करताना काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget