एक्स्प्लोर

Horoscope Today, August 22, 2022 : शेवटचा श्रावणी सोमवार ‘या’ राशींसाठी ठरणार फलदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 22, 2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा.

Horoscope Today, August 22, 2022 : आज श्रावण महिन्याच्या शेवटचा सोमवार आहे. आज मृगशीर्ष नक्षत्र असून, चंद्र मिथुन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्याने आता सिंह राशीत प्रवेश केला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा. वाचा संपूर्ण राशीभाविष्य...

मेष (Aries Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि लाभाच्या संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या संपतील. परंतु, शत्रूपासून सावध राहा. तुमची बेजबाबदार वृत्ती त्रासदायक ठरू शकते. शेअर बाजारातून लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांक्ष्ह्य अभ्यासासाठी काळ चांगला आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमच्यात उत्साह संचारलेला असेल. कोणतेही काम त्वरित करण्यासाठी तयार असाल. अति उत्साहामुळे स्वतःपेक्षा इतरांच्या कामात जास्त लक्ष द्याल, ज्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्च करताना नीट विचार करा. कुटुंबाततील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य राखण्यासाठी बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा तुमच्या बोलण्याने कोणी नाराज होऊ शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : मन प्रसन्न राहील. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कार्यक्षेत्रात जबाबदारीत वाढ होऊ शकते. कामाचा व्याप वाढेल. अनावश्यक भांडणे टाळा. मनःशांती लाभेल. संभाषणात संयम ठेवा. नोकरीत अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. आरोग्याबाबत जागरुक राहा.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमचे जीवन आणखी सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. घरातील काही कामांबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. ऑफिसमधील एखादे गुंतागुंतीचे प्रकरण आज सुटू शकते. नवीन व्यावसायिक लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते.

सिंह (Leo Horoscope) : आज दिवसभर तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात काही पैसे मिळतील. इतरांशी बोलताना संयम ठेवा. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल. मनःशांती लाभेल. कोणत्याही मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. बौद्धिक कार्यातून पैसा मिळवता येईल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस व्यस्ततेचा असेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधींचा पुरेपूर फायदा घ्याल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायिकांना त्यांची कार्यपद्धती बदलून चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन लोक भेटतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. पैसा जपून वापरा.

तूळ (Libra Horoscope) : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. एखाद्या सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारीही करू शकाल. मनात एखादी चिंता सतत सतावेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. आज आर्थिक गुंतवणुक करणे टाळा. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढतील, परंतु अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुमचा दिवस सामान्य जाईल. स्वतःच्या मेहनतीने तुम्ही कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रशंसा करू शकतात. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करू शकता. तसेच, कौशल्ये वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होऊ शकता.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. आज मित्र आणि कुटुंबियांसोबत छान वेळ घालवाल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्यास मिळाल्यामुळे आनंद होईल. शहाणपणाने निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील, अन्यथा कोणीतरी तुमचा फायदा घेऊ शकते.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस नवीन बदल घेऊन येत आहे, मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात सुखद बदल घडतील. अनेक योजना प्रत्यक्षात येतील, सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसायातील अडकलेली प्रकरणे मार्गी लागतील. एखादा मोठा निर्णय घेऊ शकाल, ज्यामुळे लाभाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्या मान-सन्मानात वाढ करेल. व्यवसायात फायदेशीर परिस्थिती राहील आणि उत्पन्नाचे इतर स्रोत देखील मिळू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा सन्मान होऊ शकतो. वादात अडकलेले लोक एखाद्या मित्राची मदत घेऊ शकतात. नोकरीत अधिकार्‍यांकडून आपली प्रशंसा ऐकून तुम्हाला आनंद होईल. आज एखादे प्रमोशन देखील मिळू शकते. भागीदारीत व्यवसाय करणे फायदेशीर ठरेल.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आर्थिक योजना अडकू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे विनाकारण वादात पडू नका. व्यापारासाठी दिवस मध्यम फलदायी आहे. कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक करणे टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget