एक्स्प्लोर

Horoscope Today, August 2, 2022 : मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 2, 2022 : मेष राशीच्या लोकांना कठीण काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून सल्ला आणि पाठिंबा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका.

Horoscope Today, August 2, 2022 : आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असून चंद्र कन्या राशीत आहे. गुरु आणि सूर्य कर्क राशीत भ्रमण करत आहेत. मेष राशीच्या लोकांना कठीण काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून सल्ला आणि पाठिंबा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) :  नम्र स्वभावामुळे फायदा होईल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि पदोन्नतीचीही शक्यता निर्माण होईल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. राजकारण्यांना कारकिर्दीत यश मिळेल. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याविषयी सखोल माहिती घ्या. कठीण काळात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून सल्ला आणि पाठिंबा मिळू शकतो. समाजसेवी संस्थांसोबत सामाजिक कार्यात हातभार लावाल.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. एखाद्या विशिष्ट कामासाठीची तुमची इच्छा आणि मेहनत सार्थकी लागेल. त्यामुळे समाजात तुमच्या योगदानाची आणि कार्याची प्रशंसा होईल. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका, यामुळे जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतात. अशा एखाद्या व्यक्तीची भेट होईल, जिचे विचार तुमच्यासारखे आहेत.

मिथुन (Gemini Horoscope) : मेहनतीचे काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. पाल्याच्या यशाची चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहील. मालमत्तेशी संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात धनालाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आज केलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत एखादी आनंददायी बातमी ऐकायला मिळू शकते. जवळच्या व्यक्तीसोबत सुरू असलेले वाद मिटतील आणि एकमेकांशी असलेले संबंध पुन्हा मधुर होतील. काही महत्वाची माहिती देखील प्राप्त होईल, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. मात्र, काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करू शकतात.

सिंह (Leo Horoscope) : पैसा खर्च करताना काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल. टॅलेंटच्या बळावर तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता. काही अनावश्यक खर्च आणि आव्हानांचाही सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या महत्त्वाच्या कामातील एखादा अडथळा दूर होऊ शकतो.

कन्या (Virgo Horoscope) : घरामध्ये आणि व्यवसायात योग्य संतुलन राखण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. वैयक्तिक संबंध देखील सुधारतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकीने घरात सकारात्मक ऊर्जा राहील. शेजारी किंवा मित्राशी वाद होण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याचे पालन करा. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला एखाद्याच्या मदतीची आवश्यकता भासू शकते.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्या मान-सन्मानात वाढ करेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखू शकता. मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. कोणतीही योजना अंमलात आणण्यापूर्वी, त्याच्या सर्व स्तरांवर चर्चा करा. यामुळे तुम्ही कोणत्याही मोठ्या चुका करण्यापासून वाचू शकता. मुलांच्या करिअर संदर्भात काही चांगली माहिती मिळू शकते. वेळेनुसार आपल्या वागण्यात बदल करणे आवश्यक आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : नवीन व्यवसाय योजना ठरवू शकता. इतरांची सेवा करून तुम्हाला आत्मसमाधान मिळेल. जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद तुम्हाला संपवावे लागतील आणि मुलाच्या करिअरमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करावी लागेल. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढतील, त्यामुळे काही सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. स्वतःच्या विकासासाठी थोडेसे स्वार्थी बनावे लागेल..

धनु (Sagittarius Horoscope) :  आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतात. राजकारणात विशेष लाभाचे योग निर्माण होत आहेत. व्यवसाय बदलासाठी मित्राची मदत मिळू शकते. कुटुंबातील जुने वाद संवादाने मिटतील. आपल्याला आपल्या कामाच्या पद्धतीत नाविन्य आणावे लागेल. व्यवसायात सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर (Capricorn Horoscope) : वैयक्तिक कामात अधिक वेळ खर्च होईल. मानसिकरित्या आराम वाटेल. एखादे रखडलेले कामही पूर्ण होऊ शकते. नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळेल. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कामात खूप व्यस्त राहिल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विचार करून काम करा. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. जोडीदारासोबतचे काही वाद संवादानेच सोडवू शकाल. एकत्र मोठी रक्कम मिळाल्याने मन समाधानी राहील. मनःशांती मिळेल. स्पर्धेच्या निकालांमध्ये पक्षपात होऊ शकतो. सध्याची परिस्थिती नकारात्मक असली, तरी आज काही लाभदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जोडीदाराला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करा.

मीन (Pisces Horoscope) : नोकरी-व्यवसायात यशाचे योग निर्माण होत आहेत. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना फायदा होईल. पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. आज एखाद्या जुन्या समस्येवर उपाय शोधल्याने भविष्यात अधिक दिलासा मिळू शकेल. काही फायदेशीर परिणाम देखील दिसून येतील. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल. कामाचा भर अधिक असल्याने, कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget