एक्स्प्लोर

Horoscope Today, August 19, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंदमय! जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope Today, August 19, 2022 : मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी जवळच्या मित्रांचा सल्ला खूप उपयोगी पडेल.

Horoscope Today, August 19, 2022 : मेष राशीतून चंद्र सकाळी वृषभ राशीत प्रवेश करेल. आज कृतिका नक्षत्र आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी जवळच्या मित्रांचा सल्ला खूप उपयोगी पडेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. मेहनतीतून अपेक्षित यश मिळू शकते. नोकरीपेशा लोक नवीन वाहन, घर इत्यादी खरेदीची योजना आखतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. पैशाशी संबंधित काही समस्या असतील, तर त्याही दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. मेहनतीनुसार आर्थिक लाभ मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्यासाठी आजचा चांगला जाणार आहे. तुटलेली नाती पुन्हा जोडण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. स्वप्नांना एक नवीन दिशा मिळेल. जवळच्या मित्रांचा सल्ला खूप उपयोगी पडेल. विचारातील सकारात्मकता तुम्हाला यश मिळवून देईल. तुमच्या बोलण्याने सगळेच प्रभावित होतील. ज्यांना नोकरी बदलायची आहे, अशांसाठी देखील दिवस महत्त्वपूर्ण आहे. एक मोठी संधी चालून येण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उंचावण्यासाठी चांगला आहे. कमीत कमी मेहनतीचेही चांगले फळ मिळेल. ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज सहज पूर्ण करता येतील. बॉस आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर असेल. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क (Cancer Horoscope) : दिवसाची सुरुवात तुमच्या जीवनात नवीन बदल घडवून आणेल. वैवाहिक जीवनात प्रेममय वातावरण राहील. व्यवसायात एखाद्या व्यक्तीचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरू शकतो. जीवनात योग्य दिनचर्या अंगीकारल्यास फायदा होईल. आज तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. परदेश दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेऊ शकता. दिवसभर कामात व्यस्त असाल. पण, संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तयार योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजातील लोकांमध्ये तुमची ओळख वाढेल. पैशाशी संबंधित समस्या आज दूर होतील. लग्नासाठी जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगली स्थळे सांगून येतील. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल.

कन्या (Virgo Horoscope) : कामाचा व्याप वाढू शकतो. आरोग्याबाबत सावध राहा. जास्त राग राग करणे टाळा. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. कामात व्यस्त असल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येणार नाही. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. हातातील कामे आजच पूर्ण करा. अन्यथा वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

तूळ (Libra Horoscope) : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. साठवलेले पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. चांगल्या भविष्यासाठी एखाद्या योजनेत काही पैसेही गुंतवू शकता. चांगल्या कमाईसोबतच अनावश्यक खर्च देखील वाढतील. कुटुंबातील सदस्यांशी काही वाद असेल, तर मौन बाळगणेच हिताचे राहील. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना प्रमोशन मिळताना दिसत आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग खुला होणार आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. आज एखादी चांगली बातमी कानी येईल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातवरण असेल. राजकारणाशी संबंधित लोकांच्या कामाचे कौतुक होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवू शकता.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुमचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. समाजातही ओळख वाढेल. भावनिक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांनी कामात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. योग्य माहिती न घेता कुठेही गुंतवणूक करणे टाळा. एखाद्या चांगल्या सामाजिक कार्याचा भाग होऊ शकता. कामात यश मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. व्यवसाय करणारे लोक कामानिमित्त प्रवासाला जाऊ शकतात. हा प्रवास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणतीही कायदेशीर बाब कोर्टात सुरू असेल, तर तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे. पोटाशी संबंधित काही समस्या भेडसावू शकतात. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.

कुंभ (Aquarius Horoscope) : मानसिक ताण कमी करा. व्यवसायात चांगली वाढ होईल. कामाचा व्याप वाढेल. एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्याची योजना बनवू शकता. खर्च जास्त होईल. आत्मविश्वास कमी होईल. बौद्धिक कामे उत्पन्नाचे साधन होऊ शकतात. भौतिक सुखात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे होण्याची शक्यता आहे. चांगली बातमीही मिळेल.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला जाणार आहे. हाती घेतलेले काम नक्की यशस्वी होईल. एखाद्या छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस योग्य आहे. वडिलांचाही पाठिंबा मिळू शकतो. नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे हाच तुमचा सर्वात मोठा चांगला गुण आहे. नोकरीसाठी नवीन संधींचा शोध आज पूर्ण होईल. कामात खूप प्रगती होईल. धार्मिक बाबतीत रस वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget