एक्स्प्लोर

Horoscope Today, August 17, 2022 : मेष, कन्यासह ‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 17, 2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.

Horoscope Today, August 17, 2022 : आज अश्वनी नक्षत्र असून, सूर्य सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला उत्साही वाटेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसा मिळू शकतो. नोकरी व्यवसायात कोणताही मोठा सौदा किंवा भांडवल गुंतवण्यापूर्वी त्यातील महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष द्यावे, अन्यथा तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागू शकतो. सामाजिक कार्यात चांगला वेळ घालवाल. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे, प्रयत्नांना यश मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यवसायात देखील प्रगती होईल. सर्जनशील क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. मान-सन्मान मिळेल. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज अनेक फायद्यांमुळे तुमचा उत्साह आणखी वाढेल. कामात टार्गेट पूर्ण करू शकाल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. पत्नी आणि मुलांकडून लाभदायक बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. विवाहासाठी योग्य जीवनसाथी शोधणाऱ्या तरुण-तरुणींना चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून येणारा काळ चांगला आहे. मात्र, प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज तुम्ही प्रत्येक काम सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरीत तुमचे अधिकारी आनंदी राहतील. बढती होण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणाने चर्चा होईल. घराच्या सजावटीवर काही खर्च होऊ शकतो. सरकारी लाभ होतील आणि आरोग्य चांगले राहील.

सिंह (Leo Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्ही पैसे कमवू शकता, परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. घरातील वातावरणामुळे नाराज होऊ शकता. काम आणि घरातील दबाव यामुळे थोडा तणाव येऊ शकतो. सामाजिक आणि धार्मिक कामांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. पैसा जपून खर्च करा.

कन्या (Virgo Horoscope) : आज केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षितता वाढवेल. कोणतेही नवीन काम सुरू करू नका. बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. पाणी असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा. महत्त्वाचे निर्णय घेताना जोखीम टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. योग्य मोबदला न मिळाल्याने मनात दुःख राहील. गुप्त शत्रूंपासून सावध राहा.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस काय्हीन असू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. सहकारी तुमच्या तुमच्या कांतील चुकांचे भांडवल करून काम खराब करण्याचे काम करतील. तुम्ही तुमच्या योजना किंवा तुमच्या महत्त्वाकांक्षा सहकार्‍यांना सांगू नका किंवा त्यावर चर्चा करू नये. नोकरी व्यवसायात तुमचा खर्च वाढेल, पण नफाही राहील. आज तुम्ही तणाव विसरून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. कामाच्या ठिकाणी एकापाठोपाठ एक आव्हाने येऊ शकतात. एखादा नवीन प्रकल्पही मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. परंतु.,पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. लांबचा प्रवास टाळा. महत्त्वाच्या कागदपत्रांसंबंधित काम करताना काळजी घ्या. फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात मित्रांची मदत मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस फलदायी आहे. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या अभ्यासाच्या चिंतेने मन उदास राहील. कामात यश न मिळाल्याने रागाची भावना जास्त राहील. प्रिय व्यक्तीसोबत रोमांचक क्षणांचा आनंद घेऊ शकाल. नवीन व्यक्तीशी झालेली भेट आनंददायी असेल. वादांपासून किंवा चर्चेपासून दूर राहणे चांगले.

मकर (Capricorn Horoscope) : तुमच्या नोकरीच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. नोकरी व्यवसायात सुधारणा होईल. जर, कोणी भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करणार असेल, तर आजचा दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा सकारात्मक दृष्टीकोन उपयुक्त ठरेल. तुमच्या अनेक समस्या दूर होतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही शरीर आणि मनाने आनंदी राहाल. तुमच्या मनावरील चिंतेचे ढग दूर झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. एखादा प्रवासही होऊ शकतो. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीने तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. अधिकारी नोकरदार लोकांची प्रशंसा करतील.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. लाभाच्या संधी येतील. कार्यालयात उच्च अधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळेल. व्यापारी वर्गाला नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल, तर आजचा दिवस शुभ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे, इच्छित परिणाम प्राप्त होतील. प्रेम जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या विचारांचा आदर केला पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Embed widget