एक्स्प्लोर

Horoscope Today, August 14, 2022 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 14, 2022 : मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. वृषभ राशीच्या लोकांची नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

Horoscope Today, August 14, 2022 : आज चंद्र कुंभ राशीत आहे. दुपारनंतर चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. आज पूर्वाभाद्रपद नक्षत्र आहे. सूर्य कर्क राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. वृषभ राशीच्या लोकांची नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वाचा संपूर्ण राशीभविष्य..

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस अतिशय व्यस्ततेच असू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकचा भर असेल. काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हानही असेल. आर्थिक स्थिती सुधारेल, अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसाय क्षेत्रात नवीन करार होऊ शकतो, जो खूप फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढेल, नवीन कामांची रूपरेषा आखली जाईल. आरोग्याची काळजी घ्या, अशक्तपणा जाणवेल. कामात अडथळे येऊ शकतात.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. परंतु, भांडवली गुंतवणुकीशी संबंधित योजनांचा विचार करूनच पैसे गुंतवा. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानदायी ठरू शकतात. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. गोड बोलण्याच्या आणि हसण्याच्या सवयीमुळे आजूबाजूचे लोक प्रभावित होतील. व्यवसायातील समस्या दूर होतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जीवनात इतरांसाठी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. आर्थिक समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाण्याची योजना आखू शकता.

कर्क (Cancer Horoscope) : तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळेल आणि तुम्ही पूर्ण मेहनतीने कामात व्यस्त व्हाल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. एकापेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये सहभागी व्हाल आणि हातातील वेळ देखील कमी पडेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकेल. एखादी परीक्षा देण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस योग्य ठरेल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला जाईल. शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. तुम्हाला मनःशांतीचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी काम करण्याच्या शैलीत छोटे-मोठे बदल करून तुम्हाला लाभ मिळवता येतील. शत्रू पक्ष वर्चस्व गाजवू शकतो, विनाकारण कोणालाही फसवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त प्रवास करू शकता.

कन्या (Virgo Horoscope) : नोकरीत सुरू असलेल्या अडचणी आज दूर होतील. विद्यार्थ्यांना फायदा होईल. आज प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. घरातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन आणि मालमत्तेत गुंतवलेला पैसा अडकू शकतो. प्रवास घडण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आज सुखकर राहील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

तूळ (Libra Horoscope) : आज आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. बऱ्याच काळापासून सुरु असलेली आर्थिक संकटे कमी होतील. प्रलंबित बिले आणि कर्जाची परतफेड करू शकाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. यामुळे तुमच्या दोघांमधील नाते दृढ होईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण्याचे दु:ख तुम्हाला सतावत राहील. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्याची योजना बनवू शकता.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस आळसात जाणार आहे. त्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. आर्थिक गुंतवणुकीचे किंवा महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढतील, परंतु अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. घरात नातेवाईकांची ये-जा सुरु राहील.

धनु (Sagittarius Horoscope) : आज पैसे जास्त खर्च होतील म्हणून पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करावेत. वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होतील. प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थी अभ्यासात कंटाळा करतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च करणे टाळा.

मकर (Capricorn Horoscope) : ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. घरगुती कामात रुची वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. नवीन प्रकल्पात मित्रांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी जाऊ शकता. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. काही योजना पैशाच्या बाबतीत खूप उपयुक्त ठरतील.

कुंभ (Aquarius Horoscope) : दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आर्थिक योजना बारगळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण वादात पडू नका. व्यापारासाठी दिवस मध्यम आहे, कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक करणे टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. हातातील सर्व कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

मीन (Pisces Horoscope) : व्यापारी व्यवसायात नफा कमावतील. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळेल. आज तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ होऊ शकतो. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला रखडलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक योजनांवर हुशारीने पैसे गुंतवा, अन्यथा नंतर नुकसान सहन करावे लागेल. व्यावसायिक कामांमध्ये शेवटच्या क्षणी बदल करावे लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget