एक्स्प्लोर

Horoscope Today, April 28, 2022 : कर्क, कन्यासह ‘या’ राशींना धनलाभ होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, April 28, 2022 : कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना आज शांतपणे काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, April 28, 2022 : आज उत्तराभाद्रपद नक्षत्र आणि चंद्र मीन राशीत आहे. आज गुरू आणि चंद्र मीन राशीत एकत्र आले आहेत. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीतही आहे. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना आज शांतपणे काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : विचारांमध्ये सकारात्मकता आणावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते पुढे ढकलणे योग्य नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकतो.

वृषभ (Taurus Horoscope) : तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. सध्या ज्या संस्थेत काम करत असाल, तिथे तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आनंद घेऊन येईल. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. मात्र, अचानक काही आजार डोकं वर काढतील आणि त्यावर उपचार करावे लागतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज आपली कार्यक्षमता वाढवण्याचा विचार करावा. शेअर बाजारात सक्रिय असणाऱ्या लोकांनी आज अधिक सावध राहण्याची गरज आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळवावे लागेल, तरच ते अपेक्षित यश मिळवू शकतील. वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर चांगली बातमी मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : वायफळ खर्च करणे टाळावे लागेल. अन्यथा तुम्ही तुमचा जमा केलेला पैसाही खर्च कराल. भविष्याच्या दृष्टीने हे घातक ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. आज रागाच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका. विचार केलेली बरीचशी कामे हळूहळू पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : ऑफिसमध्ये आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. पडलेले अनेक प्रश्न सुटतील. आरोग्य चांगले राहील. जे काही काम सुरू कराल, ते वेळेवर नक्की पूर्ण होईल. आज करिअरशी संबंधित नवीन संधी मिळू शकते. मात्र, तब्येतीची काळजी घेऊनच काम करा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नासाठी चांगली स्थळे सांगून येतील.

कन्या (Virgo Horoscope) : आज एखादा जवळचा मित्र भेटेल, ज्याच्याशी बोलून तुम्हाला आनंद होईल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणार्‍यांना भरपूर फायदा होईल. मात्र, संभाषणात सौम्यता जपावी. आरोग्याच्या दृष्टीने खाण्याबाबत निष्काळजीपणा योग्य नाही.

तूळ (Libra Horoscope) : दीर्घकाळ प्रलंबित कामे आज सहजतेने पूर्ण करू शकाल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. अनावश्यक वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थी कोणत्याही नवीन स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मिळणार्‍या लाभामुळे नोकरदार वर्ग आनंदी राहील. जंक फूडचे सेवन अजिबात करू नये, ते आरोग्यासाठी चांगले ठरणार नाही.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा कठीण असणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांशी संबंध चांगले राहतील. शांतपणे आणि पूर्ण मन लावून काम केले पाहिजे. तुमची शक्ती चांगल्या कामात खर्च कराल. जीवनसाथीच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन करण्याचा निर्णय घ्याल. नोकरीशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आज एखादा जुना मित्र तुम्हाला भेटेल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. रखडलेल्या कामात मित्राची मदत मिळेल, त्यामुळे कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. कोणताही नकार आला, तर ते अपयश मानून निराश होऊ नका. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. व्यवसाय वाढवण्यासाठी काही नवीन मार्ग शोधावे लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा.

मकर (Capricorn Horoscope) : आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये काही सकारात्मक परिणाम मिळतील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन योजना तयार कराल. शत्रू तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध रहा. पैसे गुंतवताना काळजीपूर्वक विचार करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : कौटुंबिक वातावरण आज अधिक आनंदी असणार आहे, कुटुंबासोबत त्याचा आनंद घ्या. व्यवसायातही शत्रू तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध रहा. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होईल. जोडीदाराला यश मिळेल. नवीन लोकांना भेटणे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. राजकारणाशी संबंधित लोकांचा मन सनम वाढेल.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्ही एखाद्या बाबतीत मोठा निर्णय घ्याल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. व्यावसायिकांना आज काही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात जिव्हाळा वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कलह टाळावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget