एक्स्प्लोर

Horoscope Today, April 21, 2022 : वृषभ आणि कन्या राशींसाठी दिवस ठरणार आनंदाचा! जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Horoscope Today, April 21, 2022 : वृषभ आणि वृश्चिक राशींसह अनेकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. तर, मीन राशीच्या व्यक्तींना आज आज दिवसभर सावध राहावं लागणार आहे.  

Horoscope Today April 21, 2022 : आज मूल नक्षत्र आहे. चंद्र धनु राशीत तर, शनि मकर राशीत आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु मीन राशीत आहेत. धनु राशीतील शुक्र आणि उर्वरित ग्रहांची स्थिती तशीच राहील. यावेळी वृषभ आणि वृश्चिक राशींसह अनेकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. तर, मीन राशीच्या व्यक्तींना आज आज दिवसभर सावध राहावं लागणार आहे.  

मेष (Aries Horoscope) : आज समाजातील लोकांचे सहकार्य तुमचा उत्साह आणखी वाढवेल. अनेक ठिकाणांहून आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज तुमच्याकडे अनेक निवडी असतील, यात नेमकं कोणतं निवडावं यात तुमचं दुमत होईल. प्रेमात काही चुकीचे बोलला असाल, तर आजच प्रिय व्यक्तीची माफी माग. कामाच्या ठिकाणी लोकांशी बोलताना समजूतदारपणा आणि संयम बाळगा. कर्ज घेऊ इच्छित असाल, तर ते सहज मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : तुमच्या आयुष्यात अनेक सुखद आणि अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. राजकरणात सक्रीय लोकांना दिवसभरात आनंदाची बातमी मिळू शकते. महत्त्वाकांक्षा आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. व्यवसायासाठी काळ चांगला असून, आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. गुंवणूक फायदेशीर ठरेल. कुणाशीही मनमोकळेपणाने बोलताना सावध राहा.

मिथुन (Gemini Horoscope) : तुम्हाला व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवसभरात थकवा आणि तणाव जाणवू शकतो. कुणासोबतही आर्थिक व्यवहार करताना ती व्यक्ती विश्वासू आहे की, नाही याची खात्री करून घ्या. दिवसभरात थोडीशी विश्रांती घ्यावी लागेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी नवीन गोष्टी करा. मनोरंजन करणाऱ्या साधनांमुळे काहीसा आराम वाटेल.

कर्क (Cancer Horoscope) : जुन्या मित्राची भेट होणार आहे, हा क्षण आनंददायी असेल. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही काम अत्यंत सावकाश आणि विचारपूर्वक करा. करिअरमध्ये बदल करण्याची इच्छा असेल, तर नवी संधी मिळू शकते. विवाहयोग्य लोकांना आज चांगली स्थळ सांगून येतील. मात्र, यावर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करावी.  

सिंह (Leo Horoscope) : आपल्याकडील काम अतिशय मनःपूर्वक पूर्ण कराल. तुमचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यावर कोणाशीही चर्चा करू नका. या दरम्यान जुने एखादे काम पूर्ण करू शकाल. भविष्यासाठी एखादी योजना तयार कराल. कोणतीही गोष्ट करताना कुटुंबाचा सल्ला अवश्य घ्यावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे गेल्यास लाभ संभवतो.

कन्या (Virgo Horoscope) : कामानिमित्त प्रवास होईल, यामुळे थकवा जाणवू शकतो. नाती घट्ट करण्यासाठी तुम्ही विशेष मेहनत घेतली असेल, तर आज त्याचे फळ मिळू शकते. आजचा दिवस खूप धमाल करण्याचा आहे. व्यासायिक दृष्टीकोनात काहीसा बदल केल्यास आर्थिक लाभ संभवतो. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मनःशांती मिळेल. बोलताना विशेष काळजी घ्या, अन्यथा काही गोष्टी बिघडू शकतात.

तूळ (Libra Horoscope) : आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हातातीत पैसा वायफळ खर्च करण्यावर आळा घालावा. अन्यथा भविष्यात आर्थिक चणचण भासू शकते. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण देखील आनंदमय असेल. व्यावसायिकांना अपेक्षित लाभ निलणार नाहीत. मात्र, खचून जाऊ नका. आजची गुंतवणूक उद्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : दिवसभरात तुमची भरपूर प्रगती होईल. यावेळी लाभ होण्याची देखील शक्यता आहे. आर्थिक चणचण काहीशी कमी होईल. मित्रांसोबतच्या नात्यात व्यावहारिकता ठेवावी लागेल. व्यावास्थित लक्ष देऊन काम पूर्ण करा. जवळच्या पैशातील काही भाग गरिबांच्या सेवेसाठी खर्च करा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करताना हात आखडता घ्या. वायफळ खर्च टाळा.

धनु (Sagittarius Horoscope) : आनंदाची बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा ठरणार आहे. मित्र आणि परिवार एकत्र आल्यामुळे उत्साहाचे वातवर तयार होईल. मात्र, काही गोष्टींमुळे तुम्हाला राग येऊ शकतो. नवी नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आपला खिसा सांभाळून खर्च करावा. अन्यथा, भविष्यासाठी ते हानिकारक ठरू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. काही नात्यांमध्ये सुरु असणारे मतभेद आज दूर होण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे आर्थिक आवक होणार नाही. पण काळजी करू नका. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आपला दृष्टीकोन आणि योजना बदलण्याची आवश्यकता आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत लोकांना नवी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.  

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कामाच्या संदर्भात नवीन संधी चालून येतील. काम करताना सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण येऊ शकतो. मात्र, हसत खेळत सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा जड जाणार आहे. रोजच्या कामात काहीशी टाळाटाळ होताना दिसतेय. यामुळे कामात आणि कौटुंबिक जीवनातही काही अडचणी येऊ शकतात. अशा प्रसंगी मन शांत ठेवा आणि काम करा. कुटुंबात वाद सुरु असतील, तर ते लवकरात लवकर मिटवून टाका. काही अविश्वासू लोकांमुळे तुमच्या सन्मानला धोका निर्माण होऊ शकतो. अशा लोकांपासून सावध राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget