Horoscope Today 6 October 2025 : आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 6 October 2025 : भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 6 October 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 6 ऑक्टोबर 2025, आजचा वार सोमवार आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्य वेळी समज द्यावी लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
विद्यार्थ्यांना सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न राहील महिला आरंभ शूर बनतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक रहा असा सांगणारा दिवस आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
फार दिवसांपासून अडकलेले पैसे हातात पडण्याचा संभव आहे श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन कराल शिक्षणात आर्थिक परिस्थितीमुळे अडथळा येईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज काही बाबतीत त्याग करावा लागेल अत्यंत कमी गरजा ठेवून आवश्यक तेथे पैसा खर्च करावा लागेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
यशाचा डोंगर चढताना दमछाक होईल परंतु मदतीचा थांबाही वाटेत लागल्यामुळे परिस्थितीवर मात कराल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आपली कुठे फसवणूक होत नाही ना त्याचा अंदाज घ्यावा महिला जास्त एकलकोंडा बनतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
तुमचे तर्क अचूक असले तरी खूपदा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतल्यामुळे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
अति भावनाशील आणि संवेदनशीलपणा आटोक्यात आणावा लागेल नातेवाईकांकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कोणत्याही गोष्टी जास्त मनावर न घेता आपले काम करत राहणे सर्वात चांगले अंधविश्वासने पैशाचा अति लोभ टाळावा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
व्यवसाय नोकरीत दुसऱ्यांशी बोलताना दहा वेळा विचार करा स्पष्ट आणि परखड बोलल्यामुळे लोकांची मने दुखावली जात नाहीत ना हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा :




















