एक्स्प्लोर

Horoscope Today 5 January 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी खर्चिक; आठवड्याच्या सुरुवातीलाच खिशाला लागणार कात्री, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 5 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस आपण भगवान शंकारला समर्पित करतो. त्यानुसार, आज ठिकठिकाणी महादेवाची पूजा केली जाते.  तसेच, नुकताच सूर्य आणि शनीने मिळून 'पंचांक योग' निर्माण केला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्या कारणाने तुमच्यावर कामाचा थोडा वाढता ताण असेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात सुख शांती लाभेल. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. मित्रांचा आज तुम्हाला चांगला सहवास लाभेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आज अनुकूल असणार आहे. आजच्या दिवसात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. तसेच, आज मुलांच्या कलागुणांचा चांगला विकास होईल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात काही नवीन बदल करणं गरजेचं आहे. तरच तुमची प्रगती होईल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज दिवसाची सुरुवात तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला थोडं नाराज व्हायला होईल. अशा वेळी कोणतंही काम करताना चातुर्याने करा. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या क्षमतेचा चांगला विकास झालेला दिसेल. आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. परीक्षेचा काळ लवकरच जवळ येणार आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, तुमच्या कामांना चांगली गती येणार आहे. तसेच, सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. भगवान शंकराची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत प्रगतीचे अनेक संकेत आहेत. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, आजच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. त्यामुळे वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अधिक दबाव जाणवेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्यीच संधी मिळेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होणार आहे. तसेच, मित्रांबरोबर तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. तसेच, आज जवळचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lucky Zodiac Signs : 5 जानेवारीचा दिवस ठरणार गेमचेंजर! भगवान शंकराच्या कृपेने एकामागोमाग मिळतील शुभवार्ता; संपत्तीत होईल भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget