Horoscope Today 4 November 2025: आजचा मंगळवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! विघ्नहर्ता पाठीशी, कामात यश मिळेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 4 November 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 4 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 4 नोव्हेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिला अति फॅशनच्या आहारी जातील, एखादं मत मांडताना तुमचा आत्मविश्वास थोडा कमी पडेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज ओंकार साधना, प्राणायामचा आधार घेतला तर, शारीरिक आरोग्य चांगले राहील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज अति भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत, घशाचे विकार होण्याची शक्यता
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांना मानसिक समाधान मिळेल, एखादी कलाकृती करण्याची स्फूर्ती मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज शिल्लक अडचणींनी निराश होण्याचे कारण नाही, महिलांना काल्पनिक चिंता आणि दुःख सतावतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज एखादी चूक करून ती स्वतःच निस्तरण्यात हुशार राहाल, नोकरी व्यवसायात नवीन योजनांचे स्वतः नेतृत्व कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज खूप काम कराल आणि स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही आत्मविश्वास द्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जशी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे कामाची पद्धत बदलाल, आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही दुखणे अंगावर काढून चालणार नाही, घरामध्ये लहरीपणा जास्त वाढेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज रोजच्या जीवन पद्धतीत काही सुधारणा कराल, नवीन वाहन घेण्याचे बेत आखाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल, जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळाल्यामुळे मनःशांती लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांचा तापटपणा वाढेल, परंतु तुम्हाला राग आला तरी लवकर शांत व्हाल.
हेही वाचा>>
2026 Yearly Numerology: खूप सोसलं.. 2026 मध्ये 'या' जन्मतारखेच्या लोकांचे भोग संपणार! कोणाला मिळणार शिक्षा? वार्षिक अंकभविष्य वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
.




















