एक्स्प्लोर

Horoscope Today 4 June 2026 : आज गुरुवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 4 June 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 4 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 जून 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. त्यानुसार, आज दत्तगुरुंची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल. प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Sharad Pawar and Sunetra Pawar: बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थेवर युगेंद्र पवारांची वर्णी, शरद पवार-सुनेत्रा पवार एकत्र
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Embed widget