Horoscope Today 4 January 2026 : आजचा रविवार 7 राशींसाठी धोक्याचा! संध्याकाळच्या वेळी 'ही' गोष्ट टाळा, अन्यथा...आजचे राशीभविष्य
Horoscope Today 4 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 4 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आज सूर्य आणि शनि मिळून पंचांक योग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आजच्या दिवसात काहीतरी नवीन वस्तू खरेदी करणं तुमच्यासाठी शुभकारक राहील. तसेच, कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय चांगला सुरळीत चालेल. आजच्या दिवशी जास्त ऑर्डर्स आल्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, आज लाल वस्तू तुमच्याजवळ ठेवणं शुभ राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस नवीन गोष्टी शिकण्याचा असेल. आज मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. यामध्ये तुम्ही नवीन गोष्टी अॅड करु शकता. काही लोकांना परदेशी जाण्याची देखील संधी मिळू शकते.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जातील. अशा वेळी पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. घरातील कामांमध्येही लक्ष केंद्रित करा. कुटुंबियांबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक वाटेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तुमच्या भावनांवर फक्त नियंत्रण ठेवा. याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची महत्त्वाची कामे आज करणं टाळा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















