Horoscope Today 30 November 2025 : आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस 'या' 5 राशींसाठी घेऊन येणार सुवर्णसंधी; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 November 2025 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 30 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाला जल अर्पण करतात. आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने देखील हा दिवस फार खास असणार आहे. त्यात काही ग्रहांच्या हालचाली देखील होतायत. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ चढ-उताराचा असू शकतो. त्यामुळे 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. पण, त्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. अशा वेळी संयम राखणं गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत प्रामाणिक असाल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना पैशांच्या बाबतीत थोडी काटकसर करावी लागू शकते. कारण नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मानसिक ताण देखील जाणवेल. पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवच चांगला जाणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. मुलांकडून देखील तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही आज पूर्ण करु शकता. कामाच्या बाबतीत दिरंगाई नको.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आज अनेक चढ-उतार असतील. यासाठी कोणतंही पाऊल उचलताना नीट विचारपूर्वक उचला. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. सहकाऱ्यांचा सपोर्ट देखील मिळेल. पण, ही वादळापूर्वीची शांतता असू शकते.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑर्डर्स येतील. त्यासाठी तुमचा आजचा दिवस फार व्यस्त जाईल. पण, त्यातूनही तुम्हाला आनंदच मिळेल. वैवाहिक जीवन सुरळीत राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांवर शत्रूंचा दबाव कायम असणार आहे. त्यासाठी तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेमात तुम्हाला दुराव्याचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी पार्टनरशी मनमोकळेपणाने संवाद साधा. नवीन वस्तूंची खरेदी करताना काळजी घ्या.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांवर आज नकारात्मक ऊर्जेचा कायम संचार असेल. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी योग्य नाही. आरोग्य मध्यम राहील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे कार्य करत आला आहात त्याची तुम्हाला पोचपावती मिळेल. त्यामुळे तुम्ही फार आनंदात असाल. फक्त जास्त भावनिक राहून विचार करु नका. थोडं प्रॅक्टिकल स्वभाव गरजेचा आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. तुम्हाला आज धनहानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. वैवाहिक स्थिती सुरळीत राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात सुरळीत होईल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















