एक्स्प्लोर

Horoscope Today 30 January 2026 : आजचा दिवस एकूण 7 राशींसाठी सतर्कतेचा; महिन्याच्या शेवटी मोठ्ठं संकट ओढावण्याची शक्यता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 30 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस आपण देवी लक्ष्मीला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी लक्ष्मीदेवीची पूजा करतात. उपवास धरतात. आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. घरात सुख-शांती, समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करतात. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. आजच्या दिवसात तुमच्या संपत्तीत वाढ दिसून येईल. पण, या पैशांचा विचारपूर्वक वापर करा. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घ्याल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीचे लोक आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील. सकाळपासूनच तुम्हाला सकारात्मक वाटेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत आज तुमची स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीबाबत चिंता सतावेल. संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या. दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायी  असणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग लाभेल. प्रेमाच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच, भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फार व्यस्त असाल. स्वत:ला देण्यासाठी वेळ नसणार. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. दत्तगुरुंच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

February 2026 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल? कोणत्या राशी होतील मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
मंदिरातून काही लोक उलट पावलांनी का बाहेर पडतात? 4 प्रमुख कारणं, फार कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल....
Guru Purnima 2026: अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
अद्भूत...यंदा गुरूपौर्णिमा तब्बल 3 राजयोगात साजरी होणार! या दिवशी गुरूंची पूजा का केली जाते? पूजेचा शुभ मुहूर्त, अचूक तिथी, भाग्यशाली राशी...
August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget