Horoscope Today 30 April 2025: आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा! धनलाभाचे संकेत, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 30 April 2025: आज अक्षय्य तृतीयेचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 30 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 एप्रिल 2025, आज अक्षय्य तृतीयाचा खास दिवस आहे. आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल, मोठ्या भावांना अशी थोडी मतभेद होऊ शकतात
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रत्येकाकडचे चांगले गुण हेरून गुणग्राहकता ठेवलीत तर तुमच्या फायद्याचे आहे
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज समज गैरसमजाच्या गाठी सोडून टाकल्या, तर मानसिक समाधान मिळेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर एकदम फ्रेश होऊन जाईल उपासकांना अध्यात्माचा मार्ग स्पष्ट दिसेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज प्रयत्न करण्याचा दिवस आहे विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याला स्मरून प्रथम अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांनी दिलेल्या शब्दाला जागावे कोणत्याही मोह कशात न अडकता ईश्वराला स्मरून काम करा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय इतरांशी स्पर्धा करण्यामध्ये सरशी राहील, पुढे मिळणाऱ्या पैशाची बीजे आज रोवली जातील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कुटुंबात मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल विद्यार्थ्यांना पूर्वीच्या अभ्यास पद्धतीत बदल करावासा वाटेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही नवीन बदलला सामोरे जाताना थोडा वेळ अवश्य जाईल, परंतु प्रयत्न सोडू नका
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरी ज्यांना शोधायची आहे त्यांनी अवश्य विचार करायला हरकत नाही वाहने जपून चालवावीत
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांना घरात इतरांबरोबर तडजोड करावी लागेल आजाराचे पथ्य पाणी सांभाळावे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्टेटस संबंधीचे प्रश्न लांब ठेवा, चांगले कोणतेही आर्थिक नियोजन आत्ता नको.
हेही वाचा :
May 2025 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचे नशीब 'मे' महिन्यात पालटणार! धनलाभाचे संकेत, मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















