एक्स्प्लोर

Horoscope Today 29 November 2025 : आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा; शनिदेवाच्या कृपेने संकट टळेल, संध्याकाळपर्यंत मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 November 2025 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 29 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 29 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीने आज कोणतीही जोखीम हातात घेऊ नये. प्रवासाची जर आवश्यकता नसेल तर तो टाळलेलाच बरा आहे. तसेच, कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. आज काळ्या वस्तूचं दान करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

आजच्या दिवशी कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामं निघू शकतात. वडिलोत्पार्जितं संपत्तीतून कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमच्या मेहनतीवर भर द्या. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाला आज तडा जाण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा अपमान होईल की काय ही भीती सतत तुमच्या मनाला जाणवत राहील. यासाठी कामात प्रामाणिकपणा ठेवा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. फक्त काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. जसे की, वाहन चालवताना सावकाश चालवा. कोणती महत्त्वाची कामे आज हाती घेऊ नका. ग्रहांच्या चालीचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तुमचं वैवाहिक जीवन देखील सुरळीत चालेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

कन्या रास (Virgo Horoscope)

शत्रूंचा दबाव तुमच्यावर कायम असणार आहे. मात्र, तुमच्या कामात कोणताच अडथळा येणार नाही. तुमचं आरोग्य चांगलं राहील. व्यवसायात चांगली प्रगती करा. शनिदेवाच्या कृपेने लाभ मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचंस आहे. तुमच्या दिनश्चर्येत तुम्हाला काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. तसेच, नकारात्मक ऊर्जा असणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? शिक्षण, पैसा, नोकरी, करिअर कसं असेल? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
Ashadhi Ekadashi 2026: 'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
Shani Vakri 2026:  मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...
 मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना पैसे शासनाला परत करावे लागणार, आदिती तटकरेंकडून नवी अपडेट
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
Embed widget