Horoscope Today 28 December 2025 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 28 December 2025 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 28 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 28 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाला जल अर्पण करतात. पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला एखादी भीती सतत सतावू शकते. तसेच, आज तुमच्या खर्चातही विनाकारण वाढ झालेली दिसेल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला डोकेदुखी, डोळे दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो. अशा वेळी जास्त मानसिक ताण घेऊ नका.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.आजच्या दिवसात कुठेही लांबच्या प्रवासाला जाऊ नका. तसेच, तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. कोणत्याही एका कामात तुमचं मन रमणार नाही. तुमचा व्यवसाय चांगला सुरु असेल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope)
व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला मनासारखे रिझल्ट्स नाही मिळणार. त्यामुळे तुमचं मन थोडं नाराज होईल. पण हिंमत हारु नका. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तसेच, प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज रविवार असल्या कारणाने मुलांचा दिवस आनंदात जाईल. आरोग्याची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. आजच्या दिवशी लाल वस्तू तुमच्याजवळ ठेवणं शुभकारक राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाचा आलेख वर चढताना दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजच्या दिवसात तुम्ही एखादी चांगली सवय स्वत:ला लावून घेऊ शकता. किंवा स्वत:मध्ये काही बदल घडवून आणू शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. काही तुमची रखडलेली कामे आज पार पडतील. महत्त्वाच्या कामामध्ये जास्त वेळ घालवू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. आजच्या तुमच्या हातून शुभकार्य घडेल. तसेच, घरगुती कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेची करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आज सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज महत्त्वाची कामे करु नका. तसेच, पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार आज हातात घेणं टाळा. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. आरोग्याच्या बाबतीत थोडेफार चढ-उतार तुम्हाला सांभाळावे लागतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस चागंला असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार असतील. मात्र, हळुहळू परिस्थिती नियंत्रणात राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















