Horoscope Today 27 May 2025: आज शनि जयंतीचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 27 May 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 27 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 27 मे 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज शनि जयंती आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टी थोड्या सौम्यतेनेच घेतलेल्या बऱ्या, थोड्याशा कारणावरून मन स्वस्थ बिघडू शकते
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक प्रश्न थोडे भेडसावतील, परंतु कर्जाऊ रक्कम मिळू शकते
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज रात्र थोडी आणि सोंगे फार याचा अनुभव घ्याल, वाहने जपून चालवा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर संघर्ष टाळण्याकडे प्रवृत्ती ठेवा, लगेच हमरी तुमरी वर आलात तर गोष्टी अंगलट येतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्यावे लागेल, भावंडांशी मतभेद संभवतात
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धंद्यात नफा होईल, तुमची इच्छाशक्ती ग्रहमान तुम्हाला देणार आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यामध्ये असलेली बौद्धिकता आज कामाच्या बाबतीत उपयोगी पडेल, महिला मुलांच्या कला कलाने वागतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड द्यायला शिकाल, त्यावर मात करून अनेक कामे मार्गी लावाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरच्यांसाठी थोडा कमी वेळ दिला जाईल, यावरून वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज समोरचा प्रतिवादी थोडा कमी पडण्याची शक्यता, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज सर्व बाबतीत मनासारखे लाभ झाल्यामुळे मनाला शांती मिळेल, कलाकारांच्या उत्तम कलाकृतींना रसिकांची दाद मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नेत्रविकाराच्या दृष्टीने डॉक्टरी सल्ला घेणे कर्म प्राप्त ठरेल.
हेही वाचा :
Gajkesari Yog 2025: 28 मे पासून 'या' 5 राशींनी टेन्शन विसरा! मिथुन राशीत बनतोय जबरदस्त गजकेसरी योग, पैशाचा पाऊस, श्रीमंतीचे योग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















