Horoscope Today 24 July 2025: आज दत्तगुरूंच्या कृपेने 'या' 6 राशी ठरणार भाग्यशाली! दीप अमावस्येचा शुभ संयोगही, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 24 July 2025: आजचा गुरूवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 24 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 24 जुलै 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येला ग्रहांचा दुर्लभ संयोग होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ चांगली मिळेल, तुमच्या आनंदी स्वभावाचे दर्शन लोकांना घडेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो मित्रमंडळी समाजात सहलीचे बेत ठरतील, उत्तम बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कलाकार मंडळींना पोषक ग्रहमान आहे, लेखन वाचनाची हाऊस भागवून घेता येईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज स्वतःचे वर्चस्व कायम राखाल, त्वचा विकार किंवा सतत डोके दुखणे याचा त्रास जाणवेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज थोडेसे लहरी आणि अविचारी बनण्याची शक्यता आहे, कोणताही भपकेबाजपणा किंवा पोकळ डामडौल करू नका
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिला अनाठायी उत्साह दाखवतील. प्रवासाचे योग येतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज उत्तम कल्पनाशक्ती आणि अंतस्फूर्ती याचा अनुभव घ्याल, लेखक, कवी, चित्रकारांना आपली कला समाजासमोर नेण्याची संधी मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकाल, कसोटीच्या क्षणांना सामोरे जावे लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज यशस्वी व्हायचे असेल, तर आळस झटकून कामाला लागलं पाहिजे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो स्वतःच्या कर्तुत्वाने अनेक नवीन गोष्टींना उजाळा द्याल. काही सूचक स्वप्न पडू शकतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज राजकारणी लोकांना जनतेचा उद्धार,, सेवाभाव या गोष्टींविषयी आत्मीयता वाटेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागतील, घरात आनंदी वातावरण लाभेल.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: अरे व्वा..श्रावणातला पहिलाच दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! 25 जुलैला ग्रहांचा अद्भूत संगम, भोलेनाथांची कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















