Horoscope Today 23 May 2025: आजचा शुक्रवार 'या' 5 राशींचं नशीबाचं चक्र फिरवणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने होईल धनलाभ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 23 May 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 मे 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज आज तुमची मते इतरांना पटणार नाहीत, तुमच्या विचारात आणि आचारात नाविन्याची झलक असेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसाय तुमचे काम वैशिष्ट्यपूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ खूश होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील, त्या क्षेत्रात एकापेक्षा अनेक कामे करण्याची शक्यता आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याचा अनुभव घ्याल, तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे जवळची माणसे दुखावतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांना कामाच्या बाबतीत नावीन्य शोधण्याचा कल राहील, नोकरी व्यवसायामध्ये कागदपत्रांमध्ये कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज मानसिक अस्थिरता जाऊन क्रियाशील बनाल, उत्तम आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी या दोन्हीमुळे नोकरी व्यवसायात फायदा होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज उत्तम कल्पनाशक्तीमुळे कवी कला लेखक यांच्या हातून चांगले साहित्य निर्माण होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज एखाद्या कामातील सखोल चिंतनामुळे कामाचा दर्जा सुधारेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज जवळच्या लोकांना आवश्यक ती मदत करण्याची वृत्ती राहील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज ऊस गोड लागला म्हणून मुळासकट कोणी खात नाही ना, याची सावधानता बाळगावी लागेल, नवीन कल्पनांना पोषक वातावरण मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांना कामाच्या बाबतीत तारेवरची कसरत करावी लागेल, स्वतःबद्दल कधीतरी शांत बसून विचार करणे गरजेचे राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आपण जे काम करतो, त्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक ठरेल.
हेही वाचा :
Budh Uday 2025: 8 जून तारीख लक्षात ठेवा! बुधाचा मिथुन राशीत उदय, 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार, श्रीमंतीचे योग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


















