Horoscope Today 23 January 2023 : आज सोमवार, 23 जानेवारी रोजी मकर राशीनंतर कुंभ राशीत चंद्राचे भ्रमण होत आहे. आज कुंभ राशीमध्ये शनि, शुक्र आणि चंद्राचा त्रिग्रही योग तयार होईल. अशा स्थितीत आज सिंह राशीच्या लोकांनी काहीही बोलण्यापूर्वी विचार करा, नाहीतर नुकसान होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी आज खर्च वाढेल. कुंभ राशीमध्ये बनलेला त्रिग्रही योग आज तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकेल ते पाहा. जाणून घ्या राशीभविष्य



मेष
मेष राशीतील ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की, अनावश्यक काळजी त्रासदायक ठरू शकते, ते टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. सभोवतालच्या लोकांवर रागावणे टाळा. नशिबाने साथ दिली तर तुम्ही कामात एखादा पराक्रम दाखवाल. कौटुंबिक जीवन देखील आनंदी दिसेल. जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी सहलीला जाण्याचा बेत होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. पाण्यात अक्षता मिसळून शिवलिंगावर अर्पण करा.



वृषभ
वृषभ राशीच्या लोकांच्या ग्रहांची स्थिती पाहता खर्चात थोडी काळजी घ्या अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. नोकरदारांना यश मिळेल आणि दूरच्या भागातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. कुटुंबातील वडिलधारी सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. लव्ह लाईफ मधील लोकांसाठी दिवस खूप अनुकूल असेल, परंतु वैवाहिक जीवनात काही कारणाने तणाव येऊ शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध आणि बेलपत्रावर पांढरे चंदन लावून अर्पण करा.



मिथुन
मिथुन राशीच्या ग्रहांची स्थिती पाहिली तर आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नवीन व्यवसायाबद्दल खूप उत्साही असाल आणि व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेत मन व्यस्त राहील. वैयक्तिक जीवनात आनंद असेल, जीवनसाथी देखील रोमँटिक शैलीत दिसेल. जे लोक प्रेम जीवनात आहेत ते त्यांच्या जोडीदाराशी लग्नाबद्दल बोलू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. पिठ, तूप आणि साखरेपासून बनवलेले अन्न भगवान शंकराला अर्पण करावे.



कर्क
कर्क राशीच्या ग्रहांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो की, तुमचे सहकारी आज तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. मित्र आणि भावंडांशी चांगले संबंध राहतील, त्यांच्याशी चांगले संभाषण होईल. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल आणि तुमच्या प्रतिभेची प्रशंसा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील आणि जोडीदारासोबत खरेदीला जाता येईल. लव्ह लाईफमध्ये तणाव दिसून येईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर 21 बेलपत्र अर्पण करा आणि तांदूळ दान करा.



सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज विचारपूर्वक बोला. एखाद्याला मदत करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. घरातील वातावरण थोडे अशांत असू शकते. लव्ह लाईफमध्ये आनंद राहील आणि रोमान्सही वाढेल. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कोणतीही वैयक्तिक बाब शेअर करू शकता. विवाहित लोक आज त्यांच्या जोडीदाराच्या वागण्याने थोडे निराश होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा, अन्यथा मतभेद वाढू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने असेल. प्रदोष काळात काळे तीळ मिसळलेला कच्चा तांदूळ दान करा.



कन्या
कन्या राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील आणि आपल्या विनोदी शैलीने इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये फायदा होईल. गाडी जपून चालवा, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते. नशिबाची साथ मिळाल्याने काही रखडलेली कामेही पूर्ण होतील. विवाहित लोकांना त्यांच्या जीवनसाथीच्या यशाने आनंदी राहण्याची संधी मिळेल.आज नशीब 67% तुमच्या बाजूने असेल. सोमवारी व्रत ठेवा आणि प्रदोष काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करा.



तूळ
तूळ राशीच्या लोकांनी आज थोडा विचार करून चालावे कारण त्यांचे शारीरिक स्वास्थ्य कमजोर होऊ शकते. इकडे-तिकडे गोष्टींमुळे मानसिक ताण येऊ शकतो. तुमचे पाय दुखू शकतात, म्हणून काळजीपूर्वक वागा. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचा राग तुम्ही पचवू शकणार नाही. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीपूर्ण असेल आणि वडील तुम्हाला आशीर्वाद देतील. सरकारी कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर लाल किंवा पिवळे चंदन लावावे.



वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आत्मविश्वास वाढेल आणि इच्छा पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल आणि आरोग्य देखील मजबूत असेल. घरातील काही कार्यक्रमामुळे कुटुंबातील लोकांची चलबिचल होऊ शकते. घरगुती जीवन चांगले राहील, तर प्रेम जीवनात असलेले लोक आज सहलीला जाऊ शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. ब्रह्म मुहूर्तावर शिव चालीसा किंवा शिवाष्टक पठण करावे.


 


धनु
धनु राशीच्या लोकांच्या ग्रहस्थिती दर्शवत आहेत की, आज त्यांना कुटुंब आणि कामामध्ये संतुलन राखायला आवडेल. तुम्ही घरासाठी काही आवश्यक वस्तू किंवा स्वत:साठी एखादा छान ड्रेस खरेदी करू शकता. आज खर्च होईल आणि काही धार्मिक विचारही मनात येतील. मंदिरात पूजा करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदाने भरले जाईल आणि जोडीदाराची साथ मिळेल. प्रेम जीवनातही आनंदाचा काळ असेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने असेल. प्रदोष काळात शिवलिंगावर मध अर्पण करा.



मकर
मकर राशीच्या ग्रहस्थिती दर्शवितात की, जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना तयार होईल किंवा त्यांच्याद्वारे एखादा मोठा व्यवसायिक करार फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील, पण खर्च थोडा जास्त होऊ शकतो. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबी तुमचे लक्ष वेधून घेतील आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. लव्ह लाईफ मधील लोकांसाठी दिवस चांगला राहील. नात्यात गोडवा राहील. वैवाहिक जीवनात तुम्ही काही नवीन योजना करू शकता, जे जोडीदाराला आवडेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून अर्पण करा.



कुंभ
कुंभ राशीचा मानसिक ताण आज दूर होईल, पण गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ नाही, त्यामुळे काळजी घ्या. पैशाशी संबंधित बाबींवर पूर्ण लक्ष द्या. कौटुंबिक जीवनातही चढ-उतार येतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. आज तुम्ही प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाल, ज्यामुळे व्यवसायात चांगले परिणाम होतील. तब्येतीत चढ-उतार असतील, त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. लव्ह लाईफमध्ये भरपूर रोमान्स असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने असेल. सोमवारी उपवास ठेवा आणि शिव चालिसाचा पाठ करा.



मीन
मीन राशीच्या लोकांना आज व्यवसायातून चांगला नफा मिळू शकेल. नोकरदार लोकांवर आज बॉस कामाने प्रभावित होईल. खर्च कमी होतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक मालमत्तेतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण नवीन मालमत्ता देखील खरेदी करू शकता. मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल. आज भाग्य 85% तुमच्या बाजूने असेल. भुकेल्यांना खायला द्या


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Yearly Horoscope 2023: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष? जाणून घ्या तुमचे वार्षिक राशीभविष्य