Ice Cream in Winter : आपल्या देशात लोक हिवाळ्याची (Winter Season) आतुरतेने वाट पाहतात. या ऋतूमध्ये लोकांना खूप गरम खायला आवडते, तसेच विविध प्रकारचे पदार्थ बनवणे सर्वांनाच आवडते. पण हिवाळ्यात थंडी असली तरी आईस्क्रीम (Ice Cream) खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. तसेच, जेवणानंतर नेहमी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते.
कडाक्याच्या थंडीत आईस्क्रीम खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर आज आपण हिवाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम का जास्त खायला आवडते आणि ते खाल्ल्याने शरीरात कोणते फायदे आणि तोटे होतात हे जाणून घेणार आहोत. यासोबतच हिवाळ्यात हे खास आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा होतो.
आईस्क्रीम खायची क्रेव्हिंग
तुम्हाला माहित आहे का की आईस्क्रीम डोपामाइन आणि सेरोटोनिन या दोन्हीच्या नैसर्गिक उत्सर्जनाला प्रोत्साहन देते, हे दोन्ही मूड बूस्टर आहेत? हे लक्षात घेता, आइस्क्रीम तुमचा मूड सुधारण्यास आणि हिवाळ्यात तुम्हाला आनंदित करण्यात मदत करू शकते. हिवाळ्यात लोकांना हॉट चॉकलेट आणि हॉट कॉफी खाण्याची जास्त इच्छा असते.
जाणून घ्या यामागची कारणे काय आहेत?
जेवण करण्यापूर्वी गोड खाण्याची इच्छा प्रत्येकाला असते. कुटुंबीयांशी किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना जेवणानंतर काही गोड असेल तर त्याची चव आणखी वाढते. जेव्हा तुम्ही चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करत असाल तेव्हा तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम खावेसे वाटते तेव्हा हवामान गरम असो की थंड तुम्हाला त्याची पर्वा नसते. कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की, आईस्क्रीमचे घटक उर्जेच्या वापरण्यायोग्य ब्लॉक्समध्ये तोडल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. याचाच अर्थ थंडीत आईस्क्रिम खाल्ल्याने ते शरीराला उबदार ठेवते. आईस्क्रीम सर्व प्रकारच्या मिठाईंसोबत छान लागते. तुम्हाला फक्त उबदार ब्राउनी, कोमट वॅफल, चॉकलेट लावा केक किंवा अगदी गुलाब जामुनवर आईस्क्रीमचा एक स्कूप वापरायचा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन केले तर आईस्क्रिम खूप चविष्ट लागेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :