Horoscope Today 20 August 2024 : पंचांगानुसार, आज 20 ऑगस्ट 2024, मंगळवारी श्रावणातील तिसरी मंगळागौर असून हा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज फार तर्कवितर्क लावू नयेत, तरच तुम्ही सुखी राहाल आणि दुसऱ्यांना सुखी कराल. नवी संधी दार ठोठावेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


आळस आराम आणि चैन यामध्ये वेळ दवडू नका नाहीतर यश मिळणार नाही. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


नवीन विचारांचे स्वागत करण्यातच तुमचे हित दडलेले आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयावर प्रेम करून कर्तव्यात तत्परता दाखवावी.


कर्क (Cancer Horoscope Today)


फार काळजी करू नये. महिला हसतमुख राहून वेळ आनंदात घालवतील. 


सिंह (Leo Horoscope Today)


संततीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कानावर येईल. कलाकारांची कला  बहरेल.


कन्या (Virgo Horoscope Today)


आज नावलौकिक मिळेल. घर टापटीप ठेवण्यात येथे उत्तम सुधारणा करण्यात वेळ आणि पैसा खर्च कराल.


तूळ (Libra Horoscope Today)


आज हातून कष्ट जास्त होणार नाहीत. प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


आज बऱ्याच लोकांची मने जिंकाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


महिला अल्प संतुष्ट राहतील. ठराविक चाकोरीतून जाण्याचा प्रयत्न करा.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या बोलण्याची इच्छा लोकांवर पडेल. गप्पांच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकाल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात तुमच्या बौद्धिकतेचा खूपच उपयोग होईल. भरपूर मित्रमंडळी भेटतील. 


मीन (Pisces Horoscope Today)


शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                   


हेही वाचा:


Weekly Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत