Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य

Horoscope Today 20 April 2024 : या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल.

Continues below advertisement

Horoscope Today 20 April 2024 : पंचांगानुसार, आज 20 एप्रिल 2024, आजचा दिवस शनिवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा. मित्रांच्या बाबतीत विचित्र अनुभव येतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

प्रकृती अस्वास्थ्य जाणवलं तरी त्याकडे दुर्लक्ष कराल पण ते महागात पडेल. महिला सहजीवनाचा आनंद लुटतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या  स्वभावामुळे दुसऱ्याच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. प्रसिद्धीचे योग येतील. महिला मनाप्रमाणे वागतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

दूरच्या प्रवासाच्या संधी मिळतील. फक्त मनातील सर्वच गुप्त गोष्टी बोलून दाखवायला हव्यात असे नाही.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा करून घ्या. प्रयत्नांवर विश्वास ठेवून भाग्य उजळून काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

विलंब आणि अडथळे यांना पार करून यशाचा किनारा गाठाल. व्यापारी वर्गाला पैशाची आवक अपेक्षेपेक्षा चांगली राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

घरामध्ये तुमची हुकूमशाही चालणार नाही नाहीतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

एखाद्या कारणास्तव रागाचा पारा फारच चढवाल. तुमच्या थोड्या विक्षिप्त आणि लहरी स्वभावाचा तोटा सहन करावा लागेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

कर्ज काढायचे असेल तर तशा संधी मिळतील परंतु अंथरूण पाहून पाय पसरावेत. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

साथीचे रोग किंवा विषाणू पासून होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून सावधानता  बाळगा.

मीन रास (Pisces Horoscope Today)

व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. परंतु तेथे दिशाभूल होण्याची शक्यता आहे. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावतील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हेही वाचा:

Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola