Chanakya Niti : चाणक्य नीतिचा वापर आजही अनेकजण करतात. चाणक्य नीतिचे (Chanakya Niti) पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. चाणक्य नीतिचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता. आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन काळी अखंड भारताची निर्मिती झाली. चाणक्य त्या काळात महान तत्त्वज्ञ होते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पराभूत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 


प्रत्युत्थानं च युद्धं च संविभागं च बन्धुषु ।


स्वयमाक्रम्य भुक्तं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ॥


आचार्य चाणक्य यांच्या रचना शास्त्राच्या सहाव्या अध्यायातील 17 व्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं आहे की, पुस्तकांचा अभ्यास करण्याबरोबरच माणसाला सजीवांकडूनही अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे. तुमच्या कामात आणि वागणुकीत जर एकाग्रता नसेल तर वारंवार माणसाच्या वाट्याला अपयश येते. यासाठी माणसाने कोंबड्याकडून या चार गोष्टी शिकल्याच पाहिजेत. 


1. ब्रम्ह मुहूर्तावर उठा 


आचार्य चाणक्य म्हणतात की, ब्रम्ह मुहूर्तावर कोंबडा रोज उठतो. तुम्हालाही जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठा. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या वेळेचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने वापर करू शकता. 


2. युद्धासाठी नेहमी तयार राहा 


कोंबड्याची दुसरी सवय म्हणजे नेहमी युद्धासाठी तयार राहणे. याचाच अर्थ असा आहे की,  आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्ही आळशी असाल तर तुम्ही मागे राहू शकता. यासाठी तुमचे काम करण्यास सदैव तयार राहा.


3. समान वाटप देणे 


कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणे. देव आणि भावाच्या वाट्याचा अपहार करू नये, असं शास्त्रात सांगितलं आहे. कोंबडा नेहमी आपल्या भावांना समान वाटा देतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या भावाला त्याचा योग्य वाटा द्या.


4. धैर्याने खाणे 


कोंबड्याची चौथी सवय म्हणजे धैर्याने खाणे. आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने निर्भीडपणे जेवायला हवे. यामुळे व्यक्ती मजबूत होते. निरोगी मन आणि शरीर असलेली व्यक्ती उत्साहाने आपले काम करू शकते. या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यास माणूस आयुष्यात कधीही अपयशी होत नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : 2025 मध्ये 'या' राशींवर सुरु होणार शनिची साडेसाती; मानसिक त्रासाबरोबरच प्रचंड धनहानीचाही करावा लागणार सामना