Baba Vanga Prediction: मरण्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी बल्गेरियामधील प्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याची अनेकदा चर्चा घडते. तसे उल्लेख सापडल्याचंही सांगितलं जातं.. कोविड महामारी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, बाब वेंगा यांची अनेक भाकितं अचूक ठरल्याचं बोललं जातं. सध्या भारत पाकिस्तान युद्धानंतर सोशल मीडियावर बाबा वेंगांची एक भविष्यवाणी चांगलीच व्हायरल होत आहे. या भविष्यवाणीमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा आणि युद्धाचा उल्लेख केला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वांगांचे नक्की भाकित काय होते? जाणून घेऊया...
बाबा वेंगांचं धक्कादायक भाकित
बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये होणाऱ्या होणाऱ्या युद्धाबद्दल भाकित केल्याचं सांगितलं जातं. त्यांनी म्हटलं होतं की, 2025 मध्ये असे काहीतरी घडेल ज्यामुळे दोन देशांमध्ये विनाशकारी युद्ध होईल. या लढाईमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होईल. त्यांच्या या भाकिताला भारत आणि पाकिस्तानाच्या तणाव परिस्थितीशी जोडले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संबंध बरेच बिघडले आहेत. आता युद्धबंदी झाली असली तरी तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचचली आहेत. 2025 मध्ये मोठ्या युद्धाच्या शक्यतेबद्दल त्यांनी बोलले आहे. मात्र, बाबा वांगाने त्यांच्या भाकितात कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. बाबा वांगा यांनी भाकित केले होते की 2025 मध्ये युरोपीय देशांमध्ये एक युद्ध होईल. ज्यामध्ये अनेक मोठे देश सहभागी होतील आणि संपूर्ण जगाला त्याचा फटका बसेल. असं भाकित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
बाबा वेंगांची कोणती भाकितं खरी ठरली?
कोविड-19 साथीच्या आजाराबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचं सांगितलं जातं.. याशिवाय, 2024मधील आर्थिक संकटाची गोष्ट खरी ठरल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय अमेरिकेतील 9/11 चा हल्ला आणि 1997मध्ये प्रिंसेस डायनाचा मृत्यू याचाही बाबा वेंगांच्या भाकितांमध्ये समावेश आहे. 2025 मध्ये युद्धाबद्दलची त्यांची भविष्यवाणी समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा:
Astrology : महिलांनी कोणत्या पायात बांधावा काळा धागा? वाचा काळा धागा बांधण्याचे फायदे