Astrology : सध्याच्या काळात पाहायचं झाल्यास, आपल्या आजूबाजूला पायात काळा धागा बांधणाऱ्या अनेक महिला आणि मुली दिसतात. बऱ्याचदा लोक याला फक्त फॅशन ट्रेंड मानतात. मात्र, यामागे आध्यात्मिक कारण आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. 

खरंतर, काळा धागा ही फक्त शोभेची वस्तू नाहीये. तर, याचा संबंध ऊर्जेचं संतुलन करण्यासाठी, नकारात्मक शक्तींपासून सुरक्षा करण्यासाठी आणि वाईट नजरेपासून सुटका करण्यासाठी देखील केला जातो. प्राचीन काळापासून असं मानण्यात आनं आहे की काळा धागा हा नकारात्मक विचार, नजर दोष आणि अदृश्य शक्तींपासू आपलं संरक्षण करतो. 

कोणत्या पायात बांधावा काळा धागा?

ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या महिलेला पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यासाठी डाव्या पायात धागा बांधणं उपयुक्त ठरतं. काळा धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

काळा धागा कोणत्या दिवशी आणि कसा बांधावा?

काळा धागा बांधण्यासाठी शनिवारचा दिवस हा सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर शनी मंदिरात जावे. देवाला तेल अर्पण करावे. या दिवशी पायात काळा धागा बांधावा. 

काही लोक सरळ पायात काळा धागा बांधतात. मात्र, जर तुम्ही पूजेच्या ठिकाणी थोड्या वेळासाठी ठेवून मनात ध्यान करता करता बांधला तर त्याचा प्रभाव जास्त वाढतो. 

काळा धागा बांधण्याचे फायदे 

  • वारंवार आजारी पडल्यानंतर शरीराच्या ऊर्जेला संतुलित करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. 
  • जर वैवाहिक जीवनात वारंवार अडचणी येत असतील तर, शनिवारच्या दिवशी हा धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 
  • नोकरी किंवा व्यवसायात मेहनतीचं फळ न मिळाल्याने काळा धागा बांधावा. 
  • जर कुंडलीत शनी, राहू, केतूची स्थिती अशुभ असेल तर काळा दागा बांधणं लाभदायक ठरेल. 
  • घरातील मानसिक अशांततेचं वातावरण शांत करण्यासाठी काळा धागा बांधावा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य