एक्स्प्लोर

Horoscope Today 2 October 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 2 October 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 2 October 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 2 ऑक्टोबर 2026 चा आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. लवकरच शनि वक्री होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. तुमच्या कामाच्या गतीवर देखील परिणाम दिसून येईल. तसेच, जे तरुण आज जॉब इंटर्व्ह्यूसाठी जातील त्यांना सकारात्मक बदल दिसतील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. तुमच्या वैवाहिक जीवनात छान स्थिरता दिसून येईल. एकमेकांना सपोर्ट कराल.तसेच, धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची वाढलेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतायत असं तुम्हाला वाटेल. पण कामाच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तुमचे विरोधक तुमचा सूड घेण्यास तयार असतील. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्तीची भरभराट होईल. आज मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात फार उत्तम असमार आहे. आज तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळले. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या दिवसाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतायत. महत्त्वाची कामे करण्यात वेळ दवडू नका. तसेच, घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.

तूळ रास (Libra Horoscope)

आज तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अनेक क्षेत्रात तुमचा वावर असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास सुखकर असेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील. त्यामुळे तुम्हाला फार सकारात्मक वाटेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. राजकारणी लोकांपासून दूरच राहा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या कामात थोडीशी दिरंगाई दिसून येईल. तसेच, अचानक थंडी वाढल्यामुळे तुम्हाला थोडा सर्दीचा त्रासही जाणवेल. आज महत्त्वाच्या कामांना आराम द्या. आणि कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून विश्रांती घ्या.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या दिवसाची सुरुवात खास असेल. आज फार दिवसांनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवाल. घरात चांगली सुख शांती नांदेल. तसेच, लक्ष्मीच्या पावलांनी लवकरच घरात पैसा येण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सिनिअर्सकडून तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आदल्या दिवसापेक्षा जास्त खास असणार आहे. आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर असलेले वाद मिटतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या समस्या आज संपतील. तसेच, शनिदेवाच्या कृपेने लवकरच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. घरगुती कामात तुमचं मन रमेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Malavya Rajyog 2026 : दिवाळीआधीच 4 राशींना धनलाभाचे योग; मालव्य राजयोगामुळे सुख-समृद्धी नांदणार, पैशांत खेळतील राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
Diwali 2026: दिवाळी 2026 मध्ये अद्भूत योग! यंदा लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा, शुभ मुहूर्त....
दिवाळी 2026 मध्ये 3 अद्भूत संयोग! यंदा लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त माहितीय? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा, शुभ मुहूर्त....
कामाख्या शक्तिपीठ: जिथे सृष्टीच्या सृजनशक्तीची होते उपासना!
कामाख्या शक्तिपीठ: जिथे सृष्टीच्या सृजनशक्तीची होते उपासना!
Shani Sade Sati: 2026 संपतोय, 2027 मध्ये 'एक' रास अशी, जिची परीक्षा, संयम अन् शनि साडेसाती! नववर्षात काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
2026 संपतोय, 2027 मध्ये 'एक' रास अशी, जिची परीक्षा, संयम अन् शनि साडेसाती! नववर्षात काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Satara DCC Bank : गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Satara DCC Bank Election : रामराजे ते शिवेंद्रराजे,सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीतून दिग्गजांची माघार, कोण बिनविरोध? कोण रिंगणात?
Embed widget