Horoscope Today 2 January 2026 : आज 'या' 7 राशींच्या आयुष्यात येणार मोठ्ठं वादळ, वर्षाच्या सुरुवातीलाच घडतील अनपेक्षित घटना; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 2 January 2026 : आज ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे.

Horoscope Today 2 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 2 जानेवारी 2026 चा दिवस आहे. आज नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे. तसेच, आजचा वार शुक्रवार असल्या कारणाने हा दिवस आपण देवी लक्ष्मीला समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त देवीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या खर्चातही वाढ झालेली दिसेल. खाण्या-पिण्याची वेळीच काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आर्थिक दृष्टीकोनातून तुमचा आजचा दिवस लाभदायी असणार आहे. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या हातात काही चांगले प्रोजेक्ट्स येऊ शकतात. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुम्ही जे कार्य कराल त्यात पार्टनरचा सहभाग तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. आज एखादी महत्त्वाची माहिती तुमच्या हातात लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस समस्यांतून मोकळं होणारा आहे. गेले अनेक दिवस तुमच्या आयुष्यात जे वादळ सुरु होतं ते वादळ आज शमण्याची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी बदलताना दिसतील. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अधिक लक्षपूर्वक काम कराल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडून तुमच्या फारशा अपेक्षा नसतील. मात्र, तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करत राहा. अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमची एक चूक तुमचं भविष्य ठरवू शकते.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने काम करा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात डोकावू शकतात. अशा वेळी त्यांना कितपत स्थान देणं हे तुमच्या हातात आहे. तसेच, जर तुमच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्याची कबूली आजच द्या अन्यथा हातून वेळ निघून जाईल. आज एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु नका. समस्या येण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्ही आज प्रवास कराल. मुलांच्या देखील कलागुणांचा विकास झालेला दिसेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि संयमाचा असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. त्यामुळे वेळीच सावध राहा. आज कोणतीही महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका. तसेच, घरगुती कामांमध्ये तुमचा सहभाग दाखवा. आजच्या दिवसात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या अंगाशी येऊ शकतो.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी देखील आजचा दिवस व्यस्ततेचा तसेच सावधानतेचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढलेला दिसेल. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. तसेच, वेळेवर जोप घ्या. आज वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बाबतीत आश्चर्यकारक घटना घडू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस मिश्रीत स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या एका कामाच्या संदर्भात सतत चिंता वाटेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुमचं लक्ष लागणार नाही. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तसेच, शेअर मार्केटच्या संदर्भात तुमचे शेअर्स कोसळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचं एखादी सरकारी योजनेचं काम पूर्ण होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लवकरच परदेशात जाण्याची संधीदेखील मिळेल. आज काही जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होऊ शकतात. काही नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमची काही रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















