Horoscope Today 18 March 2025: पंचांगानुसार, आज 19 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही, प्रेमीयुगोलांनी आपले प्रस्ताव कुटुंबीयांसमोर मांडण्यास हरकत नाही.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आपल्या बोलण्याने समोरच्याची मने जिंकाल, विद्यार्थी ज्या ज्ञानशाखेचा अभ्यास करत असतील, त्यामध्ये प्रगती होईल 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे, हे आज तुम्हाला पटकन समजेल 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


महिलांना स्वतःच्या आवडीनिवडी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत भासेल 


सिंह रास (Leo Horoscope Today)


तुमचा सकारात्मक दृष्टिकोन केवळ तुमच्यासाठीच नव्हे, तर आजूबाजूला असलेल्या सर्वांसाठीच प्रगती कारक ठरेल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये जेवढी पात्रता आहे, ती पणाला लावून आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करावी 


तूळ रास (Libra Horoscope Today)


आज तुम्ही केलेल्या कामाचा उपयोग चांगला होणार आहे, कष्टाचे फळ मिळेल 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला चेतना मिळेल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


तुमच्या मूळच्या धाडसी महत्त्वाकांक्षी स्वभावाला साजेसे काम मिळेल 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आर्थिक घडी चांगली बसेल, समाजात तुमच्या नेतृत्वाला लोक पूर्ण न्याय देतील


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


महिलांनी घरातील काम करताना, आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला सांभाळावे 


मीन रास (Pisces Horoscope Today)


वैवाहिक सौख्यामध्ये, जोडीदाराच्या स्वभावाबाबत तडजोड करावी लागेल.


समृद्धी दाऊलकर (ज्योतिषाचार्य)


 हेही वाचा>>


Lucky Zodiac Sign: 19 मार्च तारीख भाग्याची! 'या' 5 राशींचं होणार चांगभलं, सोन्याचे दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)