एक्स्प्लोर

मेष,तूळ, मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस महत्त्वाचा, जाणून घेऊया 12 राशींचे आजचे राशीभविष्य 

Horoscope Today 18 May 2023: राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. जाणून घ्या आजचं राशीभिष्य. 

Horoscope Today 18 May 2023: आजचा दिवस काही राशींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कर्क राशीचे लोक आज खूप आनंदी राहतील. तसेच या राशीच्या लोकांच्या घरी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. धनु राशीच्या लोकांवर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. मेषपासून ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल?  जाणून घेऊया आजचे राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.  नोकरीत काही विशेष कामांमुळे चांगला फायदा होईल. तसेच आज तुम्ही कोणतीतरी नवी वस्तू विकत घ्याल.  आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला आज फायदा मिळेल.  तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवाल. तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत देखील आज चांगली सुधारणा होईल.  तुमची थांबलेली कामे आज पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच तुमचे सकारात्मक विचार आज तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस ठिक जाईल. जे लोक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी अनुभवी लोकांशी संपर्क साधतील.  तसेच बेरोजगार लोकांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आज तुमच्या व्यस्त कामकाजातून तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढाल, आणि त्यांच्यासोबत काही निवांत  क्षण एकत्र घालवाल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल.  आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक काम असेल, परंतु तुम्ही सगळी कामे वेळेवर पूर्ण कराल

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. बँकिंग संबंधित लोकांची कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच घरातील काही कामात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती आज फारशी चांगली नसू शकते. शेअर बाजार आणि जोखमीच्या कामांपासून दूर राहा. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ओळखीच्या व्यक्तींशी संवाद साधतील. विद्यार्थी  शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाऊ शकतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ते अधिक मेहनत घेताना पाहायला मिळतील. 

कर्क

जर आपण कर्क राशीच्या लोकांचा आजचा आनंददायी असणार आहे. जे समाजाच्या चांगल्यासाठी काम करतात, त्यांचा मान समाजात आणखी वाढेल. मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. मुलांसोबत तुम्ही काही निवांत क्षण घालवाल, ज्यामुळे सर्वजण आनंदी होतील. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.तुमचा जोडीदार तुमच्या सर्व कामात मदत करताना दिसेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या आईला सांगाल. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. तुम्ही भविष्यासाठी पैसे गुंतवाल. तसेच तुमच्या प्रियकरासोबत तुम्ही प्रेमाचे काही क्षण घालवाल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस  खूप चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरी बदलण्यासाठी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्यास मदत होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबाकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही नक्कीच पार पाडाल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या आईला सांगाल. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाचे योग आहेत.  हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येतील, परंतु तुमचा आत्मविश्वास कायम राहिल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग येईल. 

कन्या

जर आपण कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.  घरबांधणीशी संबंधित कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत यश मिळाल्याने तुम्ही आनंदी राहाल. कामाचा ताण वाढेल.  व्यवसाय वाढवण्यासाठीही तुम्ही नवीन योजना आखाल. आरोग्याबाबत काळजी  घ्यावी लागेल. जोडीदारासोबत काही निवांत क्षण घालवाल. नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामधून अधिक उत्पन्न मिळू शकेल. परंतु सध्याच्या नोकरीच करणे फायदेशीर ठरु शकते. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन अधिकारी मिळतील.  प्रेमसंबंधात थोडी दुरावा येईल. तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातले सांगण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक वातावरण खूप सकारात्मक राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील.  मित्राच्या मदतीने रखडलेले पैसे मिळतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. जर तुम्ही  योगा आणि ध्यान केले तर तुम्हाला आज दिवसभर ताजेतवाने वाटेल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.

वृश्चिक

 जर आपण वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा  दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुम्हाला नोकरीत नवीन पद मिळाल्याबद्दल उत्साही राहाल. घरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे घरात पाहुण्यांचे येणे-जाणे असेल. तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधाल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. तसेच राजकिय क्षेत्रात देखील यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. 

धनु

जर आपण धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस  चांगला जाणार आहे. बँकिंग आणि आयटी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला आज संघर्षानंतर यश मिळेल. रखडलेले पैसे आज मिळण्याची शक्यता आहे.  कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. संपत्तीचे व्यवहार करणाऱ्या लोकांचा उद्या  चांगला व्यवहार होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःसाठी काही खरेदी कराल. प्रवासााला जाण्याचे योग आहेत. हा प्रवास तुमच्यासाठी आनंदाचा होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रवसादरम्यान काही खास लोकांशी ओळख देखील होईल. जे लोक घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत, त्यांना घरच्यांची आठवण  येईल. 

मकर

जर आपण मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस  आनंददायी असणार आहे. बँकिंग आणि मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उद्या नोकरदारांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, इकडे तिकडे लक्ष दिल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी  कामाचा ताण अतिरिक्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू कराल.  नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. नोकरीसोबतच आणखी काही काम देखील तुम्ही करु शकता, जेणेकरून  तुमचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.  

कुंभ

जर आपण कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकतील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार कराल.  बँकिंग आणि फायनान्सच्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बाहेरचे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक कामांमध्ये बदल करण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सर्व लोक एकत्र धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.

मीन

जर आपण मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस  संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, परंतु तुम्हाला जुन्या नोकरीत प्रगतीचा मार्ग देखील मिळेल. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे, परंतु जर तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. जेवणाचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या पालकांचा सहवास आणि त्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही आईसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget