Horoscope Today 18 August 2025: आजचा चौथा श्रावणी सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथ करतील रक्षण, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 18 August 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 18 ऑगस्ट 2025, आजचा वार सोमवार आहे. आज श्रावणातील चौथा सोमवार असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या अस्वस्थ, चंचल बनतील संसारात तडजोड करावी लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या स्वभावामुळे बऱ्याच अडचणी दूर होतील, तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेऊ नका
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरातील कोणत्याही गोष्टीच्या निर्णयाबाबत चुकीचे निर्णय घेत नाही ना हे तपासून पहा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कर्ज काढले असेल तर त्याचे हप्ते वेळेत भरावे लागतील, साथीचे रोग किचकट जुन्या आजारापासून सावधानता बाळगावी
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची तब्येत सांभाळणं आवश्यक राहील, व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग पाहून स्पर्धक तुम्हाला शह देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आखण्याची शक्यता आहे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यापारी वर्गाने स्वतःची मर्यादा सोडू नये, विद्यार्थ्यांचा मूड करमाणुकीकडे राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्या व्यासंगाचा उपयोग करून उत्तम समय सूचकता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर काम पूर्ण कराल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल, तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुम्ही केलेल्या प्रत्येक कामामध्ये शिस्त दिसेल, लेखक कवी पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज उथळ पाण्याला खळखळ फार असतो, ही म्हण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणूक ठेवा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे, महिलांनी कडक बोलणे टाळावे.
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाचं आगमन जबरदस्त राजयोगात! श्रीगणेश 'या' 4 राशींचं भाग्य घेऊन येतायत, 10 दिवस ग्रहांचे दुर्मिळ संयोग, सुख-समद्धी येईल घरा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















