(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 18 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 18 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं आणि सगळे तुमची तोंडभरुन प्रशंसा करू शकतात. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी थोडी धार्मिक कार्य केली पाहिजे, देवावर श्रद्धा दृढ ठेवावी, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.
वृषभ (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.
विद्यार्थी (Student) - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.
विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.
कर्क (Cancer Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामावर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं.
व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, जे त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही तुमची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.
सिंह (Leo Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्हाला काही समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, काम करताना व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेणं आवश्यक आहे, फीडबॅकनुसार तुम्ही तुमच्या कामात बदल करू शकता.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तरुणांनी आपला वेळ भगवान शंकराच्या पूजेसाठी द्यावा, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील.
कन्या (Virgo Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं.
विद्यार्थी (Student) - तरुणांना आज विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा.
तूळ रास (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुमचा कामात दिवस सामान्य असणार आहे. पण, दुपारनंतर कामाचा ताण जास्त असेल. त्यामुळे थोडा थकवा जाणवेल.
व्यवसाय (Business) - तुमचा व्यापार सुरळीत चालणार आहे. तसेच, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.
विद्यार्थी (Student) - स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळू शकतं.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा तब्येत बिघडू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला. तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या घरात पैशांचा वाद होऊ शकतो.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.
व्यवसाय (Business) - सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.
विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा.
व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा.
युवक (Youth) - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल.
व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे.
लव्ह लाईफ (Relationship) - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या.
आरोग्य (Health) - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
मीन रास (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका.
युवक (Youth) - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा.
आरोग्य (Health) - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :