Horoscope Today 17 September 2025 : आजचा बुधवार 'या' 5 राशींसाठी भाग्याचा! गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 September 2025 : गणरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 September 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 17 सप्टेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. गणरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शरीर व मनावरचा ताण हलका करण्यासाठी प्राणायाम ओंकार साधना आवश्यक ठरेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल यामध्ये अहंकाराला प्रवेश दिला नाहीत तर चांगले काम करू शकाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
उत्तम व्यवस्थापन करणारे म्हणून तुमच्याकडे अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
भरपूर काम करायला प्रकृतीच्या दृष्टीने ताण जाणवला तरी त्याची पर्वा करणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
स्वतःमधील क्षमता ओळखाल आणि तिच्या आधार घेऊन काम फत्ते कराल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
सहवासात असलेल्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या सहकार्यामुळे कामाला गती मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
कोणत्याही परिस्थितीत मानसिक आंदोलने जाणवल्याशिवाय राहणार नाही परंतु स्थिर राहण्याचा प्रयत्न अवश्य करायला हवा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रचंड आतल्या गाठीचे असा शिक्का तुमच्यावर पडलेला आहे तो तुम्ही सार्थ करून दाखवाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
वैवाहिक जीवनात गैरसमजांचे जाळे पसरेल आणि कळत नकळत त्यात गुंतत जाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
स्वतःशी प्रामाणिक राहण्यात शहाणपणा आहे समजून घ्या. जोडीदाराशी सूर चांगले जुळतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर राहील त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाबाबत जागृत राहा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कामासाठी परदेश गमनाच्या संधी मिळतील. तीर्थयात्रेचे बेतही ठरतील.
हेही वाचा :




















