एक्स्प्लोर

Horoscope Today 16 October 2024 : मेष राशीच्या लोकांवर आज बजरंगबलीची कृपा; वृषभ, मिथुन राशीला धनलाभाचे संकेत, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं आणि सगळे तुमची तोंडभरुन प्रशंसा करू शकतात. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी थोडी धार्मिक कार्य केली पाहिजे, देवावर श्रद्धा दृढ ठेवावी, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 16 October 2024 : आज कोजागिरी पौर्णिमा! हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
Hindu Religion: कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
कुलदैवत माहित नसेल तर कसे शोधावे? लग्नानंतर सासर की माहेरचे कुलदैवत मानावे? धार्मिक महत्त्व, श्रद्धा काय आहे?
Mahalaxmi Rajyog 2026 : महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा
महालक्ष्मी राजयोग झाला Active; 4 राशींचा सुवर्णकाळ झाला सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget