Horoscope Today 15 June 2024 : पंचांगानुसार, आज 15 जून 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा वार शनी देवाचा आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
कलाकारांचे कलेबद्दलचे प्रेम वाढेल. ग्रहण शक्ती वाढल्यामुळे पुढच्या चांगल्या प्रसंगाची बीजे आज रोवली जातील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आज नोकरदारांपेक्षा व्यापाऱ्यांना दिवस जास्त चांगला आहे. भरपूर कष्ट कराल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
प्रवासाचे योग येतील. घरापासून जास्त वेळ दूर राहाल. जोडीदाराच्या स्वभावाची जुळवून घ्यावे लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब जाण्याचे योग येतील पैशाची परिस्थिती सुधारेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
अनावश्यक खरेदीचा मोह होईल महिलांची मानसिकता जपावी लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
जुनी आणि वसूल होतील. फक्त ज्यांच्याकडून पैसे मिळतील त्या व्यक्तींशी वितुष्ट येण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope Today)
घरातील पूर्वीचे वाद विकोपाला जाऊ शकतात. अशा वेळी समजून त्याचे धोरण स्वीकारणे आवश्यक ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता असल्यामुळे तडजोड करावी लागेल. महिला थोड्या तर्कट बनतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कोणत्याही कागदपत्रांवर विश्वास ठेवून लगेच त्यावर सह्या करणे धोक्याचे ठरेल. महिलांना गुप्त शत्रूंचा त्रास होईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
शेतीवाडी घरदार याविषयीच्या चिंता मिटतील. धडाडी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर सर्व कामाचा फडशा पाडाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
भोवतालच्या परिस्थितीशी मिळते जुळते घ्याल. घरची आणि बाहेरची दोन्ही परिस्थितींचा समतोल साधण्यात यशस्वी व्हाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज तारेवरची कसरत करावी लागली तरी मनस्वास्थ्य नक्कीच मिळेल. सर्वसाधारण सौख्य निर्माण करणारा दिवस असणार आहे.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: