Sury Budh Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 12 जून 2024 रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला. त्यानंतर 4 जून रोजी बुध राशीत परिवर्तन करून मिथुन राशीत शुक्रासह युती करून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 जून रोजी ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र ग्रहासह त्रिग्रही योग (Trigrahi Yog) जुळून येणार आहे. तसेच, बुध आणि सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोगसुद्धा बनणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव प्रामुख्याने चार राशींवर दिसून येणार आहे. या चार लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग मालमत्तेच्या बाबतीत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या काळात धन आणि संपत्तीची भरभराट होणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात नवीन ऑफर मिळू शकते. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी बुघ, शुक्र आणि सूर्याचं संक्रमण आर्थिक लाभ देणारं आहे. या काळात तुमची अनेक काळापासून थांबलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्यात नेतृत्व करण्याची क्षमता दिसून येईल. तसेच, पैशांचा वापर जपून केल्याने तुमचा बजेट संतुलित असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, बऱ्याच काळानंतर तुम्ही मागितलेली इच्छा पूर्ण होईल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांना तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकतं. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमच्या कुटुंबियांसह तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ आनंदात जाईल. 


तूळ रास (Libra Horoscope)


बुध, शुक्र आणि सूर्याच्या युतीने तूळ राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा पगार वाढू शकतो. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope Today 11 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य