Horoscope Today 15 July 2024 : पंचांगानुसार, आज 15 जुलै 2024,सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज तुमच्या चालण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब दिसेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक होईल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


व्यवसाय नोकरीत अनेक संधी तुमची वाट पाहत असतील. थोडा असेपणा सोडला तर संधीचे सोने करण्यासाठी कष्ट घेता येतील.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आर्थिक घडी उत्तम बसेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंतचे पेरलेले आहे ते नक्की उगवणार आहे.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


तुमच्या कामामध्ये काहीतरी वेगळेपणा दिसेल. नियोजन पूर्ण लोकोपयोगी  कामे हातून होतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


एखाद्या गोष्टीची व्यवस्थित मांडणी कराल आणि तिचे योग्य पद्धतीने सादरीकरण कराल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज जरा जास्त दगदग आणि कष्ट करावे लागतील. आर्थिक दृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीने त्रास उत्पन्न होऊ शकतात.


तूळ रास (Libra Horoscope Today)


परदेश गमनासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


अर्धांगवायू व वातविकार हा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे. महिला थोड्या उधळल्या बनतील. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक  ठरेल. तुमच्या हट्टी आणि दुराग्रही स्वभावाचा इतरांना त्रास होईल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


वाहने जपून चालवा तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारा दिवस आहे. व्यवसाय नोकरीमध्ये कामाचा फडशा  पाडाल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


आर्थिक आणि सामाजिक स्तरावर फायदा होईल. कर्तुत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या