Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : जुलै महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. धनु आणि कुंभसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे.तुम्ही करत असलेल्या कामांना चांगली गती येईल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, अचानक धनलाभाचे योग आहेत. आठवड्याच्या मध्यात तुमच्या व्यापारात चांगली वाढ होईल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. मन प्रसन्न असेल. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फलदायी असणार आहे. या काळात तुम्ही व्यवसायात घेतलेल्या तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल. जर तुम्हाला या काळात वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. पैशांची गुंतवणूक देखील या काळात तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आनंदाचा, उत्हासाचा तितकाच संघर्षमय असणार आहे. या काळात तुम्हाला काही संकटं देखील येतील. याचा तुम्ही धीटाने सामना करणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. जर तुमचे अनेक दिवसांपासून एखादं काम रखडलं असेल तर ते तुम्ही या काळात पूर्ण करू शकता. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचा बॉस प्रभावित होईल. अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. या कालावधीत तुमचं आरोग्य देखील चांगलं असणार आहे. नियमित व्यायाम करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. आयुष्यात तुम्ही खूप यश प्राप्त कराल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुमचं मन रमेल. प्रत्येकजण तुमच्या कामाचं कौतुक करेल. तुमचं वैवाहिक जीवन अगदी आनंदात जाईल. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला पाठिंबा मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनेक आव्हानांचा असणार आहे. या काळात तुम्ही करत असलेल्या कामापेक्षा जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तरच, तुमची प्रगती निश्चित आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं असेल पण कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :