मुंबई : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचं लग्न (Wedding) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या शाही लग्न सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज पाहुण्याची हजेरी पाहायला मिळाली. मात्र, याच लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाये मेहमान' म्हणून दाखल झालेला एक जण यूट्यूबर आणि दुसरा व्यावसायिक असल्याचं सांगितलं जात आहे.


अनंत-राधिकाच्या लग्नात 'बिन बुलाये मेहमान'


मुंबई पोलिसांनी रविवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले होते. विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचं नाव व्यंकटेश नरसैया अल्लुरी हा 26 वर्षांचा यूट्यूबर आहे आणि दुसरा व्यक्ती लुकमान मोहम्मद शफी शेख हा 28 वर्षांचा असून तो स्वत:ला व्यापारी असल्याचं सांगत आहे.






YouTuber आणि व्यावसायिक लग्नात घुसले


दरम्यान, या दोघांनाही मुंबई बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघे आंध्र प्रदेशातून अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत आले होते, असं पोलिस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींना नोटीस दिल्यानंतर आणि दोघांनाही कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना सोडून दिल्याची बातमी एएनआयने वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.






अंबानींच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा


अनंत-राधिकाच्या लग्नाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती भव्य प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतने शुक्रवारी रात्री मुंबईत राधिकासोबत लग्नगाठ बांधली. या भव्य लग्नाला देश-विदेशातील सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी उपस्थित होते. 


अनंत-राधिकाला पंतप्रधान मोदींचे शुभ आशीर्वाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शनिवारी अनंत आणि राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदी यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. यावेळी मोदी मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचले होते.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : ...जेव्हा थलायवा बिग बींसमोर नतमस्तक होतात; अंबानींच्या शाही सोहळ्यातील भारावून सोडणारा एक क्षण