एक्स्प्लोर

Horoscope Today 12 March 2026 : आज शुक्रवारचा दिवस 8 राशींसाठी संकटाचा; भूतकाळाचं सत्य समोर येणार, चोरी पकडण्याची शक्यता; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 March 2026 : सर्व 12 राशींसाठी आज सोमवारचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 12 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 मार्च 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. हा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त दत्त मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक देवीकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. आजच्या दिवसात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या निर्णयाने बॉस खुश होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस बरकतीचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवाल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्या मनासारखी एकही गोष्ट न झाल्यामुळे तुमचा क्रोध वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि निगेटीव्ह माणसांच्या संपर्कात राहू नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. घरात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. दिवसाचा शेवट मात्र निराशाजनक असू शकतो. अशा वेळी आज कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. मात्र, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.आज काही कारणास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं समाजत कौतुक होऊ शकतं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. तसेच, मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. दिवसाची सुरुवातच तुम्ची फार सकारात्मक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला आज एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

महत्त्वाच्या बातम्या

Sagittarius August Monthly Horoscope 2026: धनु राशीसाठी ऑगस्टमध्ये नोकरीत प्रमोशन, पगारवाढ? आर्थिक स्थिती मजबूत, कामाचा ताण वाढू शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
धनु राशीसाठी ऑगस्टमध्ये नोकरीत प्रमोशन, पगारवाढ? आर्थिक स्थिती मजबूत, कामाचा ताण वाढू शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
Leo August Monthly Horoscope 2026 : सिंह राशीसाठी ऑगस्टचा महिना घेऊन येणार नवीन संधी; शिक्षण, करिअर, आरोग्य कसं असेल? वाचा मासिक राशीभविष्य
सिंह राशीसाठी ऑगस्टचा महिना घेऊन येणार नवीन संधी; शिक्षण, करिअर, आरोग्य कसं असेल? वाचा मासिक राशीभविष्य
Scorpio August Monthly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट महिना संयमाचा; नोकरीत बदलीचे संकेत, मोठा खर्च होऊ शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट महिना संयमाचा; नोकरीत बदलीचे संकेत, मोठा खर्च होऊ शकतो, मासिक राशीभविष्य वाचा
Libra August Monthly Horoscope 2026: तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना भाग्याचा; करिअरमध्ये मोठ्या संधी, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील, मासिक राशीभविष्य वाचा
तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना भाग्याचा; करिअरमध्ये मोठ्या संधी, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget